Yerawada Pune Crime News | पुणे: IT कंपनीतील तरुणीवर मित्रानेच केले कोयत्याने सपासप वार; खुनाचे धक्कादायक कारण आले समोर (Video)

Murder In Yerawada

पुणे : Yerawada Pune Crime News | येरवडा परिसरातील रामवाडी येथील एका कंपनीच्या पार्किंगमध्ये उसन्या पैशांच्या वादातून तरुणीवर कोयत्याने वार करुन तिचा निर्घुण खुन करण्यात आला आहे. (Murder In Yerawada Pune)

https://www.instagram.com/reel/DEjY23ipbwV/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

शुभदा शंकर कोदारे Shubhada Shankar Kodare (वय २८, रा. बालाजीनगर, कात्रज) असे खुन झालेल्या तरुणीचे नाव आहे. येरवडा पोलिसांनी कृष्णा सत्यनारायण कनोजा Krishna Satyanarayan Kanoja (वय ३०, रा. खैरेवाडी, शिवाजीनगर) याला अटक केली आहे. कृष्णा याने शुभदा हिच्यावर इतका जोरात वार केला की त्यात तिचा उजवा हात तुटला. अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यु झाला. ही घटना रामवाडी येथील डब्ल्यु एन एस या बहुराष्ट्रीय आय टी कंपनीत (WNS Global Services in Pune) मंगळवारी सायंकाळी सव्वासहा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभदा कोदारे ही तरुणी मुळची कराड येथे राहणारी आहे. ती रामवाडी येथील डब्ल्यु एन एस या बहुराष्ट्रीय कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये अकाऊंटट म्हणून कामाला होती. तिच्याच विभागात कृष्णा कनोजा काम करत आहे. उसन्या पैशांवरुन त्यांच्यात वाद झाला होता. कंपनी सुटल्यानंतर ती कंपनीच्या पार्किंगमध्ये आली. त्याचवेळी कनोजा याने तिला गाठले. तिच्या उजव्या हातावर कोयत्याने वार केला. हा वार इतका जोरात होता की त्यात तिचा हातच तुटला. जखमी तरुणीवर तातडीने येरवड्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने उपचार सुरु असताना तिचा मृत्यु झाला. येरवडा पोलिसांनी कृष्णा कनोजा याला अटक केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके (Sr PI Ravindra Shelke) तपास करीत आहेत. (Yerawada Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Weather News | येत्या दोन दिवसात राज्यात थंडीत वाढ होण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Pune RTO | खासगी अथवा सरकारी नोकरी करणाऱ्यांकडे रिक्षा परमीट असेल तर परत करा, आरटीओ कडून होणार कारवाई

Santosh Deshmukh Murder Case | सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक;
बीडच्या विशेष तपास पथकाला यश, पुण्यातून घेतले ताब्यात