Nashik Urea Scam | कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातच युरिया घोटाळा! 90 मेट्रिक टन युरिया जप्त; 9 जणांवर गुन्हा दाखल

Scam (1)

नाशिक ः Nashik Urea Scam | शेतीसाठी वापरला जाणारा नव्वद मेट्रिक टन युरिया जप्त करण्यात आला आहे. हा जनावरांसाठी तयार करण्यात येणाऱ्या पशू खाद्यात केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. गोदरेज अॅग्रोवेट या खासगी कंपनीला हा युरिया पुरवल्याची माहिती आहे. हा युरिया गाझियाबाद आणि कोलकत्ता येथून आला होता.

ही घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आदेशानंतर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. कंपनी संचालक, युरिया पुरवठादार कंपन्या, वाहतूकदार अशा सर्व 9 जणांवर दिंडोरी पोलिस ठाण्यात (Dindori Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, कंपनीमध्ये तपासणी केल्याने 50 किलो बागेतील युरियाची किमत 24 ते 28 रुपये किलो असल्याचे लक्षात आल्यानंतर औद्योगिक वापरासाठीचा युरिया नसून, शेती वापराचा अनुदानित युरिया असल्याचे समोर आले आहे. संबंधित कंपनीसह 9 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे याठिकाणी शेती उपयुक्त युरिया वापरला जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

You may have missed