Dharashiv Crime News | खळबळजनक! मुख्याध्यापकाची पत्नी अन् मुलीची एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या

Pune Crime News

धाराशीव : Dharashiv Crime News | तुळजापूरमध्ये एका शाळेत मुख्याध्यापक असलेले संजय पवार मंगळवारी (25 मार्च) शाळेत गेल्यानंतर पत्नी रत्नमाला पवार आणि विवाहित मुलगी प्रतीक्षा पाटील यांनी एकाच दोरीला गळफास (Suicide) घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोघींनी अत्यंत थंड डोक्याने गळफास लावून घेतला असून, आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ‘लेकीला शिकायचे होते, पण वर्षभरापूर्वी शेतकरी मुलाशी लग्न लावून मुलगी नैराश्यात होती,’ असे समोर आले आहे.

मुलगी प्रतीक्षाला शिक्षण घ्यायचे होते. मात्र, शिक्षण बंद करून विवाह करण्यात आल्याचे त्यांच्या चिठ्ठीतून समोर आले आहे. प्रतीक्षा पाटील (वय 23) हिचा सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी तालुक्यातील सापटणेमध्ये शेतकरी तरुणाशी वर्षांपूर्वी विवाह झाला होता. आत्महत्या करण्यापूर्वी रत्नमाला पवार आणि प्रतीक्षा पाटील यांनी आपल्या घराचा दरवाजा बंद न करता फक्त पुढे ढकलला होता. गेटला कुलूप लावत शेजाऱ्यांना चावी दिली होती. त्यांना बाहेर जात असल्याचे सांगितले, पण दुसऱ्या दरवाजाने घरात येऊन दोघींनी गळफास घेतला. या घटनेमुळे धाराधीव जिल्हा हादरला आहे.