Pune Crime News | काय सांगता ! होय, चक्क सेवानिवृत्त पोलीस अधिकार्‍याची पुण्यातील पत्रकाराकडून तब्बल दीड लाख रुपयांची फसवणुक, जाणून घ्या कारण

Pune Crime News | Shocking! Retired Police Officer Cheated of ₹1.5 Lakh by Pune Journalist; Here’s How the Fraud Unfolded

‘मी कामानिमित्त नेहमी मंत्रालयात जात असतो, मंत्रालयातील सर्व अधिकारी, आमदार यांच्यासोबत चांगले संबंध आहेत, मी बरेच कामे केली आहेत’

पुणे : Pune Crime News | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात ७० वर्षापर्यंत सेवा करण्याच्या जी आर नुसार वयोमर्यादा गृह मंत्रालयातून वाढवून आणून देतो, असे सेवानिवृत्त पोलीस अधिकार्‍याला सांगून त्यांची दीड लाख रुपयांची फसवणुक करणार्‍या जनता न्युजच्या पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/DR3uWcPjI_U

याबाबत ७० वर्षाच्या सेवानिवृत्त पोलीस अधिकार्‍याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी राकेश वाघमारे (रा. हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १४ जून २०२४ ते २३ सप्टेंबर २०२४ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुणे शहर पोलीस दलात हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना २००७ पासून ससाणेनगर येथील राकेश वाघमारे Rakesh Waghmare (जनता न्युज – Janta News) हा त्यांच्या ओळखीचा व परिचयाचा आहे. फिर्यादी सहाय्य्क पोलिस निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आदेशावरुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे १७ डिसेंबर २०१७ ते २८ नोव्हेंबर २०२१ अखेर कोरोना काळात वरिष्ठ सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते. वयाची ६५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर महामंडळाचे तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी महाराष्ट्र शासनाचा ७० वर्षाचा जी आर डावलून त्यांना व इतरांना सेवानिवृत्त केले. इतरांना ७० वर्षीय वयाचे आदेशाप्रमाणे गृह विभाग मंत्रालय यांचेकडून आदेश प्राप्त झाल्याने त्यांना पुन्हा कर्तव्यावर हजर करुन घेतले. परंतु फिर्यादी यांना अर्ज करुनही पुन्हा हजर करुन घेतले नाही.

फिर्यादी व राकेश वाघमारे यांची भेट झाली असताना त्याने कामानिमित्त नेहमी मंत्रालयात जात असतो, मंत्रालयातील सर्व अधिकारी, आमदार यांच्यासोबत चांगले संबंध आहेत, मी बरेच कामे केली आहेत, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. गृहमंत्रालयात त्यांची फाईल ओ एस डी कौस्तुभ दिवसे यांच्याकडे प्रलंबित आहे,असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर त्याने कौस्तुभ दिवसे यांच्याशी बोलणे झाले असल्याचे सांगून त्यांच्याकडून उपमुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांच्या नावाने त्यांच्याकडून अर्ज लिहून घेतला. अधिकार्‍यांना किमान १ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास बसल्याने फिर्यादी यांनी राकेश वाघमारे याला १४ जून २०२४ रोजी १ लाख रुपये दिले. त्यानंतर त्याने जुलै २०२४ अखेर काम होईल, असा मेसेज करुन सांगितले. त्यानंतर १९ जून २०२४ रोजी गृह विभागाच्या कर्मचार्‍याच्या नंबरवर ५० हजार तातडीने पाठविण्यास सांगितले.

फिर्यादीने मुलीकडून ५० हजार रुपये घेऊन पाठविले. त्यांनी पैसे पाठविलेला नंबर कोणाचा आहे याची खात्री केल्यावर तो सुमेर परदेशी (रा. काळेपडळ ) याचा असून तो वाघमारे याचे जवळ पत्रकार म्हणून काम करीत असतो, असे समजून आले. त्यामुळे त्यांना शंका आली. तेव्हा राकेश वाघमारे याने तुमचे शिफारस पत्र पुढे पाठविले असल्याचा मेसेज करुन सांगितले. त्यानंतर तो वारंवार काम होत आले आहे, काळजी नसावी, असे मेसेज करुन सांगत असे. परंतु, फोन घेत नसे. ४ ऑक्टोंबर २०२४ रोजी राकेश वाघमारे याने मेसेज द्वारे कळविले की, दुपारी मुंबईला बोलावले आहे, कृपया खर्चासाठी १५ हजार रुपये पाठवावे, २ दिवस लागणार आहेत. त्यावर फिर्यादीने वडिलांचे निधन झाले आहे. माझ्याकडे पैसे नाहीत, असे कळविले. त्यानंतर वेळोवेळी त्याच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने आजपर्यंत उत्तर दिले नाही. शेवटी त्यांनी आता हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रोकडे तपास करीत आहेत.

You may have missed