Pune PMC News | पुण्यात 1250 कोटींच्या प्रकल्पांचा धडाका; आचारसंहितेपूर्वी लोकार्पण व भूमिपूजनाची लगबग

Pune PMC News | 16 corporators from 32 villages included in the Municipal Corporation! Corporators and political parties will have an opportunity to ensure balanced development of villages; Will 'villagers' get an opportunity in important positions?

पुणे : Pune PMC News |  पुणे महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लवकरच लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने राजकीय हालचालींसोबत प्रशासनातही मोठी लगबग पाहायला मिळत आहे.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अंदाजे १२४९ कोटी रूपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्याची तयारी सुरू आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी कामांची सविस्तर आढावा बैठक घेतली.

महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण अंतिम झाले असून पुढील दोन आठवड्यांत मतदारयादीही अंतिम होणार आहे. त्यामुळे निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. डिसेंबरच्या तिसऱ्या–चौथ्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची चर्चा आहे.

भूमिपूजन होणारी कामे

बिंदू माधव चौक व पुणे विद्यापीठ चौक येथील उड्डाणपूल व समतल विलगक – १५० कोटी

शेवाळवाडी पाणी पुरवठा प्रकल्प – ३५ कोटी

मुंढवा केशवनगर टाक्या व जलवाहिनी – २७ कोटी

अमृत-२ योजनेअंतर्गत वडगाव जलशुद्धीकरण केंद्र – २०० कोटी
एकूण : ४१३ कोटींची कामे

लोकार्पण होणारी कामे

समान पाणीपुरवठा योजनेतील २० टाक्या व ४० झोन – ४५० कोटी

इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर – ५३ कोटी

जागतिक सायकल स्पर्धा मार्ग – १४५ कोटी

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प – १३.३१ कोटी

खराडी, चांदणी चौक, बाणेर अग्निशमन केंद्र – २५ कोटी

अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय ए व बी विंग – १३० कोटी

नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय – २० कोटी
एकूण : ८३६ कोटींची कामे

“आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि काही महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. एकूण अंदाजे १२०० कोटींची कामे आहेत.”

–  नवलकिशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका
– Naval Kishor Ram

You may have missed