Pune Crime News | थेऊर येथील बनावट RMD गुटख्याचा कारखाना पोलिसांनी केला उद्धवस्त, 1 कोटीहून अधिकचा माल केला जप्त  (Video)

Pune Crime News | Police bust fake RMD gutkha factory in Theur, seize goods worth over Rs 1 crore (Video)

पुणे : Pune Crime News | काही महिन्यांपूर्वी वाघोली येथील पानटपरीवर  कारचालक आणि पानटपरीवाला यांच्यात मोठी हाणामारी झाली होती. या हाणामारीमागे कारण होते, बनावट आरएमडी गुटखा. पुण्यात बनावट आरएमडी गुटख्याचे वितरण होत असल्याचे तेव्हाच लक्षात आले होते. अंमली पदार्थ विरोधी पथकाने लोणी काळभोर परिसरात गोदामावर छापा टाकून बनावट आरएमडी गुटखा तयार करणारा कारखाना उघडकीस आणला आहे. या कारखान्यातून बनावट सुपारी, सुंगधीत तंबाखु, थंडक, केमिकल, गुलाब पाणी , प्रिन्टेड पाऊच, बॉक्स व पोती असा असा सुमारे १ कोटी रुपयांचा माल जप्त केला आहे. तसेच बनावट गुटखा वाहतूक करण्याकरीता मॉडिफाय करण्यात आलेली  ३ कार अशा ५० लाखांची वाहने मिळून आली आहेत. तसेच रोख रक्कम १ लाख ३० हजार जप्त करण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/DR1zTL6ieC4

बनावट गुटखा तयार करणार्‍या कंपनीचे मालक रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता Rohit DurgaPrasad Gupta (वय २५, रा. काळुबाई मंदिराजवळ, पत्र वस्ती, थेऊर) व कामगार रामप्रसाद ऊर्फ बापू बसंता प्रजापती Ramprasad alias Bapu Basanta Prajapati (वय २५, रा. थेऊर गाव), अप्पु सुशिल सोनकर Appu Sushil Sonkar (वय ४६, रा़ कांबळे वस्ती, थेऊर फाटा), दानिश मुसाकीन खान Danish Musakeen Khan  (वय १८, रा. थेऊर फाटा, मुळ रा. उत्तर प्रदेश)यांना ताब्यात घेतले आहे. सुमित गुप्ता हा फरार झाला आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड व त्यांचे सहकारी हे अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवत असताना गुरुवारी पहाटे ५ वाजता त्यांनी  थेऊर येथील सुमित गुप्ता याच्या गोदामावर छापा टाकला. तेथे बनावट आर एम डी गुटख्याची सुंगधित तंबाखु व विमल गुटखा पान मसाला तसेच गोदामाचे बाजूस शेतामध्ये बनावट गुटखा तंबाखु तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल ठेवण्यात आला होता. पोलिसांनी सुमारे १ कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचा कच्चा माल जप्त केला आहे. तसेच ५० लाखांच्या तीन आलिशान कार जप्त केल्या आहेत.

बनावट गुटखा तयार करणारे कंपनीचे मालक व ३ कामगार यांना पकडून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त पकंज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २ चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड, तसेच पोलीस अंमलदार राजस शेख, संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे, संदिप देवकाते, गणेश गोसावी, देविदास वांढरे, शुभांगी म्हाळसेकर, दिनेश बारटेवाड यांनी केली आहे.

You may have missed