Pune PMC Elections | पुणे महानगरपालिका निवडणूक : प्रभाग 17 मध्ये भाजपाचा विजय, परंतु ‘गड आला पण सिंह गेला’; स्वप्निल शिवरकर म्हणाले – ‘भविष्यात अधिक जोमाने काम करून या भागात भाजपाला 100 % यश मिळवून देईन’
पुणे : Pune PMC Elections | काही महिन्यांपूर्वी पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा देत सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने स्वप्निल शिवरकर यांनी भारतीय जनता पक्षात सक्रिय काम सुरू केले. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ मध्ये विराज तुपे, खंडूशेठ सतीश लोंढे, प्रशांत मामा तुपे आणि शुभांगी होले (शिवरकर) यांचा अधिकृत पॅनल तयार करण्यात आला.
भाजपाच्या शीर्ष नेतृत्वाने या चौघांवर विश्वास ठेवत अधिकृत उमेदवारी जाहीर केली. कमी कालावधीत पॅनलने एकजुटीने प्रचार केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाने मोठी घुसखोरी करत विजय मिळविला.
या निवडणुकीत प्रभाग १७ मधून भाजपाचे तीन उमेदवार विजयी झाले –
१) खंडूशेठ लोंढे
२) पायलताई विराज तुपे
३) प्रशांत मामा तुपे
मात्र, पॅनलमधील चौथी उमेदवार आणि स्वप्निल शिवरकर यांच्या भगिनी शुभांगी होले (शिवरकर) यांना पराभव स्वीकारावा लागला. “गड आला पण सिंह गेला” या म्हणीप्रमाणे या निकालाबद्दल खंत व्यक्त करत, स्वप्निल शिवरकर यांनी भविष्यात अधिक जोमाने काम करून या भागात भाजपाला १००% यश मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
ते म्हणाले की, मतदारांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल ते कायम ऋणी राहतील आणि विकासाच्या कामांसाठी कटिबद्ध राहतील.
एकजुटीचे उदाहरण : चौथा AB फॉर्म देण्यात तांत्रिक विलंब झाल्याने, मैत्रीसाठी पक्षाकडून आलेले तीन AB फॉर्म परत करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला.
निवडणुकीचा अनुभव : निवडणुकीदरम्यान मिळालेला प्रशासकीय व राजकीय अनुभव लवकरच पक्ष नेतृत्वाला सादर करण्यात येणार आहे.
