Pune Crime News | ‘तू मला हो म्हण, नाही तर…’; तरुणीला मानसिक त्रास देऊन छळ करणार्‍या रोड रोमिओला पोलिसांनी दाखविला हिसका

Pune Crime News | 'You say yes to me, or else...'; Police show whip to Road Romeo who mentally harassed and tortured a young woman

पुणे : Pune Crime News |  तू मला हो म्हण नाही तर तुला जगु देणार नाही, असे म्हणून मानसिक त्रास देऊन छळ करणार्‍या तसेच घरात कोणी नाही असे पाहून गळा दाबून विनयभंग करणार्‍या रोड रोमिओला  लोणी काळभोर पोलिसांनी चांगलाच हिसका दाखविला.

याबाबत एका १९ वर्षाच्या तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी समीर अकबर हाश्मी Sameer Akbar Hashmi (वय २५, रा. कदमवाक वस्ती, हवेली) याला अटक केली आहे. हा प्रकार २०२१ पासून आतापर्यंत सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीला समीर हाश्मी गेल्या काही वर्षांपासून त्रास देत आहे. तो वेळोवेळी ‘‘तू मला हो म्हण नाही तर तुला मी जगू देणार नाही. तुझे शिक्षण घेऊन देणार नाही,  तुला मानसिक त्रास देऊ तुझा छळ करणार’’ असे म्हणून त्रास देत होता़ परंतु, भितीमुळे तिने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. घरामध्ये कोणीही नसल्याचा गैरफायदा घेऊन तो जबरदस्तीने घरामध्ये शिरत. फिर्यादी यांचा गळा दाबून विनयभंग केला. त्यावेळी फिर्यादीने आरोपीला विरोध करुन ओरडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने तिच्या ओठावर जोरात बुक्की मारुन जखमी केले. त्यानंतर तिने पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी समीर हाश्मी याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे तपास करीत आहेत.

You may have missed