Pune ACB Trap Case | जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागणारा पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

ACB Demand Case Pune | Police Sub-Inspector of Bundgarden Police Station demanded a bribe of 1 lakh; Bribe was demanded to not register a case of cheating

पुणे : Pune ACB Trap Case | खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेल्या मुलाला लवकर जामीन मिळण्यासाठी मदत करण्यासाठी व गुन्ह्याचे चार्जशीट लवकरात लवकर कोर्टात दाखल करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाचेची मागणी करणार्‍या  पोलीस हवालदारावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

रमेश लक्ष्मण नागटिळक Ramesh Laxman Nagtilak (वय ४२, रा. शारदानगर, माळेगाव, बारामती) असे अटक केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. (Pune Bribe Case)

याबाबत एका ४६ वर्षाच्या महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. त्यांच्या मुलाविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या करंजेपुल आऊट पोस्टचे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे हे करीत आहेत. रमेश नागटिळक हे तेथे पोलीस हवालदार म्हणून पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांना मदतनीस म्हणून काम करीत आहेत. तक्रारदार यांच्या मुलास जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी व गुन्ह्याचे चार्जशीट लवकरात लवकर कोर्टात दाखल करण्यासाठी हवालदार रमेश नागटिळक व पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे हे तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार १८ जानेवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागात दिली होती.

या तक्रारीच्या अनुशंगाने १८ जानेवारी रोजी पडताळणी करण्यात आली. यावेळी पोलीस हवालदार रमेश नागटिळक याने स्वत: करीता व पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे याच्याकरीता तडजोडीअंती २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांची पडताळणी नकारात्मक आली. त्यानंतर प्रत्यक्ष सापळा कारवाई होऊ शकली नाही. परंतु, लाचेची मागणी करण्यात आली असल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने  शनिवारी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पोलीस हवालदार नागटिळक याला अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे व त्यांचे सहकारी यांनी केली. पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे तपास करीत आहेत.

You may have missed