Shri Mahalaxmi Mandir Sarasbaug | श्री महालक्ष्मी मंदिरात महिला मानव संसाधन व्यवस्थापिकांचा ज्येष्ठ उद्योगपती प्रदिप भार्गव यांच्या हस्ते सन्मान

Shri Mahalaxmi Temple Sarasbaug | At Shri Mahalaxmi Temple, women human resource managers were honored by senior industrialist Pradeep Bhargava

पुणे : Shri Mahalaxmi Mandir Sarasbaug | पुण्यातील विविध कंपन्यांमध्ये मानव संसाधन क्षेत्रात व्यवस्थापिका म्हणून कर्तृत्व गाजविलेल्या महिलांचा ज्येष्ठ उद्योगपती प्रदिप भार्गव यांच्या हस्ते  श्री महालक्ष्मी मंदिरात  सन्मान करण्यात आला.

श्री महालक्ष्मी मंदिरात आजचा दिवस विशेष होता. पुण्यातील विविध कंपन्यांमध्ये मानव संसाधन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ५० हून अधिक महिला व्यवस्थापिका यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी उत्सव प्रमुख तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रविण चोरबेले, विशाल सोनी आदी मान्यवर उपस्थित होते.

अक्षता जैन, प्रियंका काणे, प्रिती गोबाडे, राखी सागरे, किरण खापरे, प्रणिता काबरा, आसावरी येवतेकर, ज्योत्स्ना, शरयु कुलकर्णी, पारिद्धी जैन, अर्पणा जोशी, प्रज्ञा मते, ईशा विसपुते, अमृता पाटील, अर्पणा जोशी, मोनिका काटकर, अपेक्षा सुपेकर, एकता वाघमारे, सायली पुजारी, निधी धांजु, वैशाली दराडे, प्रिती देशमुख, नेहा गुजराल, वैशाली कुलकर्णी, प्रिया शर्मा, ईशा जानी, हर्षा पाटील, कविता बोरा, पुजा काबरा, आराधना भाले, अदिती आठवले, प्राजक्ता बी, सोनल शेठ, सोनिका सचदेव, निकिता तेलगु, काशिश मुतकुरे, डॉ. प्रतिमा शेणॉय, मेघना कुलकर्णी, योगिता तोडकर, सोनाली चिंतामणी, सिद्धी गुपचुप, वैष्णवी गौतम, अंजली बदाम, स्वाती खंदारे, नूतन भावेकर, डॉ. श्वेता काटे, मयुरी भागवत, सारिका क्षीरसागर, किर्ती दातार, रिचा देवरे, मोक्षा ओसवाल, पृथा निबंधे, सोनाली गोळेकर,  सायली कोकाटे, सुचेता कालावार, श्रद्धा पाटील, हर्षा पाटील, यशोधना, अपर्णा चौगुले, वैशाली कुलकर्णी, अर्पणा जोशी, डॉ. संजीवनी पांडे, प्रिती साखे आदि मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

विश्वस्त भरत अग्रवाल यांनी सांगितले, सण, उत्सव ही आमची परंपरा आहे. नवरात्रोत्सवात नारी शक्तीचा जागर केला जातो.  मानव संसाधन क्षेत्रात कर्तृत्व गाजविणार्‍या महिला व्यवस्थापिकांचा गौरव करण्याची आज आम्हाला संधी मिळाली आहे. प्रदिप भार्गव यांच्यासारखे कॉर्पोरेट जगतातील व्यक्तीमत्व आमच्या विश्वकर्मा संस्थेशी जोडलेले आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे.

 प्रदिप भार्गव म्हणाले की, मी कॉर्पोरेट क्षेत्रात २ दशके कंपनीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. माझ्याकडील मानव संसाधन विभागातील महिला अधिकारी कायमच  सक्षम, स्वच्छ दृष्टीकोन असलेल्या  लाभल्या. पुजा करण्यासाठी पुजारी होण्याची गरज नसते. तुम्ही करीत असलेले काम हीच तुमची पुजा असते. मानव संसाधन हा असा विभाग आहे की, त्याला टारगेट, अजेंडा नाही, की उत्पादन वाढ, विक्रीवाढ अशा गोष्टींना सामोरे जावे लागत नाही. आजचे जग हे खूप व्यवहारी झाले आहे. मानव संसाधन हा कंपनीचा आत्मा असतो. तुम्ही माणुसकी जपा. कंपन्या आपली चांगली प्रतिमा तयार करण्यासाठी सी एस आर फंडाचा वापर करत असतात. कंपनी जशी सामाजिक बांधिलकी जपते. तसेच तुम्ही कंपनीतील कामगारांबाबत बांधिलकी जपली पाहिजे. यावेळी विशाल सोनी यांची प्रास्ताविक केले. अनुष्का कांकरिया यांनी सूत्रसंचालन केले.

You may have missed