Pune Crime News | अल्पवयीन मुलीच्या नावाने बदनामीकारक पोस्टर लावणार्या 65 वर्षाच्या नराधमावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तिला पैसे देऊन त्याने मैत्री करण्याचा प्रयत्न केला. या मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यावर या वृद्ध नराधमाने एका कागदावर बदनामीकारक मजकूर लिहून त्यांच्या परिसरात ते पोस्टर लावून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंबेगाव पोलिसांनी या वृद्ध नराधमावर गुन्हा दाखल केला आहे.
सतिश पांडुरंग खोंड Satish Pandurang Khond (वय ६५, रा. शिवकृपा रेसिडेन्सी, टेल्को कॉलनी, दत्तनगर) असे या वृद्धाचे नाव आहे. याबाबत एका १७ वर्षाच्या मुलीने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२५ व ३१ जानेवारी २०२६ रोजी घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी आणि आरोपी सतिश खोंड हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. फिर्यादीला सतीश खोंड हा कॉलेजला सोडण्यासाठी ४ ते ५ वेळा आला होता. तो तिला पैसे देण्याचा बहाणा करुन वेळोवेळी तिचा पाठलाग करत होता. फिर्यादी कोठे जातात, काय करतात, यावर नजर ठेवली. तिला पैसे देऊन तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी ही बाब घरी सांगितल्याने त्याचा सतिश खोंड याला राग आला होता. त्याने तिला पाहून घेण्याची धमकी दिली होती. खोंड याने एका मोठ्या कागदावर हाताने बदनामीकारक मजकूर लिहिला. त्याचे पोस्टर करुन त्यांच्या परिसरात लावले होते. हे पोस्टर पाहिल्यावर या मुलीने आंबेगाव पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक देवधर तपास करीत आहेत.
