Pune Crime News | लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणाचे अपहरण करुन चौघांनी ऑनलाईन पैसे घेऊन लुबाडले

crime

पुणे : Pune Crime News |  पुणे स्टेशनला सोडण्याचा बहाणा करुन कारचालक व त्याच्या साथीदारांनी तरुणाचे अपहरण करुन बंडगार्डन परिसरात फिरवुन मारहाण करुन त्याच्याकडून ऑनलाईन पैसे घेऊन लुबाडल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत प्रेमजी लालेंग पाटीदार (वय ४२, रा. नरपतगिरी चौक, सोमवार पेठ) यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नगर रोडवरील शास्त्रीनगर चौक, बंडगार्डन रोड, इंडियन आईल पेट्रोल पंपासमोर, कोरेगाव पार्क परिसरात ३० जानेवारी रोजी रात्री दहा ते ३१ जानेवारी पहाटे अडीच वाजेपर्यंत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटीदार हे पुणे स्टेशनला जाण्यासाठी रात्री गाडीची वाट पहात होते. त्यावेळी पांढर्‍या रंगाच्या कारमधून चौघे जण त्यांच्याजवळ आले. लिफ्ट देण्याचा बहाणा केला. ते कारमध्ये बसल्यावर त्यांचे अपहरण करुन बंडगार्डन रोड, कोरेगाव पार्क व इतर ठिकाणी फिरविले. त्यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन दुखापत केली. त्यांना बराच वेळ फिरविले. लोखंडी हत्याराचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.  त्यांचा मोबाईल घेऊन त्यातील गुगल पे चा पिन घेऊन त्यांच्या खात्यातून १८ हजार ८०० रुपये ट्रान्सफर करुन घेऊन त्यांना वाटेत सोडून देऊन ते पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक नंदनवार तपास करीत आहेत.

You may have missed