Pune Bribe Case | खडकीतील मिलिटरी इंजिनिअरिंगमधील कनिष्ठ अभियंत्याला 2 लाखांची लाच घेताना सीबीआयने केली अटक

Pune Bribe Case | CBI arrests junior engineer in Military Engineering from Khadki while accepting bribe of Rs 2 lakh

पुणे : Pune Bribe Case |  कामाची बिले काढण्यासाठी २ लाख रुपयांची लाच घेताना खडकीतील मिलिटरी इंजिनिअरिंगमधील कनिष्ठ अभियंत्याला सीबीआयने सापळा रचून पकडले.

सीबीआयने सहायक गॅरिसन अभियंता आणि  कनिष्ठ अभियंता यांनी ६ लाख रुपयांची लाच मागितल्याचा गुन्हा ३ फेब्रुवारी रोजी दाखल केला होता. तक्रारदार यांनी एमईएची कंत्राटे पूर्ण केली आहेत. कामे पूर्ण होऊन पुर्तता प्रमाणपत्रे सादर केल्यानंतरही त्यांची कामाची बिले काढण्यात येत नव्हती. लाच देण्यासाठी देयके रोखून धरण्यात आली होती. त्यांच्याकडे ६ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. तक्रारदार यांनी सीबीआयकडे तक्रार केली. त्याची पडताळणी करताना अभियंत्यांनी २ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्यास संमती दर्शविली. त्यानंतर तक्रारदार यांच्याकडून २ लाख रुपयांची लाच घेताना कनिष्ठ अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले. सहायक गिरीसन अभियंत्यालाही कटात सहभागी असल्याने अटक करण्यात आली. आरोपीच्या घरझडतीमध्ये १ लाख ८८ हजार ५०० रुपयांची रोकड आणि काही कागदपत्रे सीबीआयने जप्त केली आहे.

सहायक गिरीसन इंजिनियर सुनील निकम आणि ज्युनियर गिरीसन इंजिनियर सुरेश म्हस्के अशी अटक केल्याची नावे आहेत.

You may have missed