Pune Crime News | उच्चभ्रू सोसायटीमधील इमारतीच्या टेरेसवर सुरु होता बेकायदेशीर हुक्का पार्लर; स्वत:च्या मालकीच्या इमारतीत हॉटेल मालकाने सुरु केला होता नवा उद्योग, मालकासह 5 जणांवर कारवाई
पुणे : Pune Crime News | उच्चभ्रु सोसायटीमधील एका इमारतीच्या टेरेसवर चक्क बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉटेल चालविणार्याने स्वत:च्या मालकीच्या इमारतीतमध्ये हा उद्योग सुरु केला होता. सहकारनगर पोलिसांनी या हॉटेल मालकासह ५ जणांवर गुन्हा दाखल करुन हुक्का फ्लेवरचे १२ हजार ४९५ रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.
हॉटेल मालक राजसिंग भजनसिंग गोरोवाडा Rajsingh Bhajansingh Gorowada (वय ३५, रा. गुरुनानक कृपा बिल्डिंग, तिसरा मजला, राजमुद्रा सोसायटी, धनकवडी), वेटर पारस परमानंद शर्मा Paras Parmanand Sharma (वय २४, मुळ रा. नेपाळगंज, जि. बाके, नेपाळ), सुभाष मानसिंग गिरी Subhash Mansingh Giri (वय २०), तिलक भोला तिवारी Tilak Bhola Tiwari (वय ३५), नारायण मेघे आचार्य Narayan Meghe Acharya (वय ३४, सर्व मुळ रा. नेपाळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार धनकवडी येथील राजमुद्रा या सोसायटीतील गुरुनानक कृपा बिल्डिंगच्या तिसर्या मजल्यावरील टेरेसवर सुरु होता.
सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार हे ९ फेब्रुवारी रोजी पेट्रोलिंग करत गुलाबनगर चौकात आले. पोलीस हवालदार अमोल पवार यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, राजमुद्रा हौसिंग सोसायटीतील मेहेर लिव्हिंग बिल्डिंग शेजारील श्री गुरुनानक कृपा बिल्डिंगच्या तिसर्या मजल्याचे टेरेसवर हुक्का पार्लर विनापरवाना चालु आहे. या माहितीची खातरजमा करुन कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी देऊन टीम तयार करुन पाठविली. पोलीस तिसर्या मजल्यावरील टेरेसवर गेले. तेथील लाकडी दरवाजा तोडून आत जाऊन छापा टाकला. हॉलमध्ये एकूण ६ टेबल मांडलेले दिसून आली. त्यामध्ये ४ टेबलवर ८ जण हुक्का फ्लेवरचे सेवन करताना मिळून आली. या हॉटेलचा राजसिंग गोरोवाडा हा मालक आहे. हॉटेलच्या किचनची पाहणी केली असता तेथे विविध फ्लेवरचे हुक्का भरलेले चिलीमसह टेबलावर हुक्का पॉट व साहित्य मिळून आले. पोलिसांनी हा सर्व १२ हजार ४९५ रुपयांचा माल जप्त केला. सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी सांगितले की, राजसिंग गोरोवाडा याचे स्वारगेट येथे हॉटेल होते. त्याने हे हॉटेल नुकतेच बंद केले आहे. गुरुनानक कृपा ही संपूर्ण ३ मजली इमारत गोरोवाडा याची खासगी मालकीची आहे. त्याने चार दिवसापूर्वी या इमारतीच्या टेरेसवर हे विनापरवाना बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर सुरु केले असल्याचे तो सांगतो.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे, सद्दाम हुसेन फकीर, सहायक पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतरे, किरण कांबळे, बजरंग पवार, सागर सुतकर, आशिष ढमाळ, निखिल राजीवडे, अभिजित वालगुडे, महेश भगत, आकाश किर्तीकर, खंडु शिंदे, अभिमान बागलाने, अमित पदमाळे, मारोती नलवाड, रफीक तडवी यांनी केली आहे.
