Pune Crime News | शेजारी शेजारी राहणार्‍या सराईत गुन्हेगारांमध्ये जोरदार हाणामारी; तरुणाला लाकडी दांडक्याने, दगडाने मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | लोहियानगरमध्ये शेजारी शेजारी राहणार्‍या सराईत गुन्हेगारांच्या गटात जोरदार हाणामारी झाली. त्यात दोघांना लाकडी दांडक्याने व दगडाने मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. त्याविरोधातील तक्रारीत तिघांवर दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अदनान सलीम शेख (वय २४, रा. बाबु मामडी चौक, लोहियानगर) याने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मुश्ताक हुसेन शेख Mushtaq Hussain Shaikh (वय ५१), हुजेफ ऊर्फ इब्राहीम सलीम शेख Huzef alias Ibrahim Salim Shaikh (वय १९), झैद मुश्ताक शेख Zahid Mushtaq Shaikh (वय २१, तिघे रा. लोहियानगर) यांना अटक केली आहे. ही घटना लोहियानगरमधील डायमंड जनरल स्टोअर्सजवळ ८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे शेजारी शेजारी रहातात़ त्यांच्यात यापूर्वी भांडणे झाले असून दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. एकमेकांकडे पाहण्यावरुन त्यांच्यात यापूर्वी भांडणे झाली होती. फिर्यादी व त्यांचा मित्र रिझवान शेख (वय १९) हे डायमंड जनरल स्टोअर्स येथे उभे असताना जुन्या भांडणाच्या रागातून तिघांना फिर्यादी व रिझवान शेख यांना लाकडी दांडक्याने, दगडाने मारुन गंभीर जखमी केले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़ खडक पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम तपास करीत आहेत.

त्याविरोधात मोईज ईस्माईल शेख (वय २८, रा. लोहियानगर) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आफिदी ऊर्फ बुढा हुसेन शेख, अदनान सलीम शेख (वय २४), सोहेल आमीर खान (वय २९, रा. जय जवान मित्र मंडळाजवळ, लोहियानगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी हे त्यांच्या मित्रासोबत पान शॉप जवळ थांबले होते. त्यावेळी जुन्या भांडणाच्या रागातून फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली. आफ्रिदी शेख याने त्याच्याकडील लोखंडी पट्टीने मारहाण करुन फिर्यादी यांना जखमी केले. पोलीस उप निरीक्षक बोराडे तपास करीत आहेत.  

You may have missed