Chhatrapati Sambhajinagar Crime News | छत्रपती संभाजीनगर हादरलं! 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत सापडला; सावत्र आई-वडील ताब्यात

Pune Crime News

छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar Crime News | छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळूज महानगर परिसरातील तिसगाव चौफुली येथे 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नंदनी राजू धिवरे असे मृत तरुणीचे नाव असून, तिचा मृतदेह गादीत गुंडाळून रिक्षातून नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ धाव घेत कारवाई केली.

घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी गादी उघडून पाहिली असता त्यामध्ये नंदनीचा मृतदेह आढळला. प्राथमिक चौकशीत तिच्या सावत्र आई-वडिलांनी तीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे सांगितले. ते तिचे अंत्यसंस्कार करण्यासाठी गावी नेत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र मृतदेह अशा प्रकारे गादीत गुंडाळून नेण्यामागील कारणांवर संशय निर्माण झाला आहे.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टम अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, संशयाच्या आधारे सावत्र आई-वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी काही पुरावे जप्त केले असून, संपूर्ण घटनाक्रमाची सखोल चौकशी सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आत्महत्या की काही वेगळा प्रकार, याचा उलगडा आता पोलिस तपास आणि वैद्यकीय अहवालानंतरच होणार आहे.

You may have missed