Pune Police Tadipari Action | एकाचवेळी शहरातून 9 गुंडांना पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी केले 2 वर्षांसाठी तडीपार

Pune Crime News | 10 inmates deported for 2 years; 135 criminals temporarily deported

पुणे : Pune Police Tadipari Action | शहरातील बिबवेवाडी, आंबेगाव आणि मार्केटयार्ड या तीन पोलीस ठाण्याच्या परिसरात दहशत माजविणार्‍या ९ गुंडांना पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी २ वर्षांसाठी शहर, तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे़

बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या परिसरातील जालिंदर मसा मोरे (वय ४८, रा. अप्पर इंदिरानगर), अण्णा ऊर्फ  गणराज सुनिल ठाकर (वय २६, रा. अप्पर बिबवेवाडी), ओंकार लक्ष्मण सणस (वय २३, रा. बिबवेवाडी), राजु महादेव डेंगळे (वय २२, रा. सुखसागर नगर) आंबेगाव पोलीस ठाण्याकडील गुन्हेगार आकाश गुलाबराव कांबळे (वय २१, रा. शनिनगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द, मुळ रा. लक्ष्मीनगर, परभणी), कृष्णा बबन लोखंडे (वय २४, रा. शनिनगर, आंबेगाव), आर्यन बापु बेलदरे (वय २४, रा. आंबेगाव बुद्रुक), मार्केटयार्ड पोलीस ठाण्याकडील गुन्हेगार सोमगौडा गुरन्ना चौधरी (वय ३३, रा. मार्केटयार्ड), साहिल भिमा अष्टगे (वय २०, रा. प्रेमनगर वसाहत, मार्केटयार्ड) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

या गुन्हेगाराविरुद्ध बेकायदेशीर हत्यार वापरणे,  दुखापत करणे, गंभीर दुखापत करणे, धमकी देणे, मारहाण करणे, बेकायदेशीर घरात घुसणे, मालमत्तेचे नुकसान करणे, दंगा करणे, दरोड्याची तयारी करणे, इतरांचे जीवन धोक्यात आणणारी कृती करणे, दहशत माजविणे, जबरी चोरी करणे, लैंगिक अत्याचार करणे, अंमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगणे, घरफोडी करणे अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्यांच्यात सुधारणा न झाल्याने त्यांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून २ वर्षांकरीता तडीपार करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

You may have missed