Pune Wagholi Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रिक्षाचालकाला अटक करुन वाघोली पोलिसांनी रिक्षासह 2 लाखांचा माल केला जप्त

Pune Crime News

पुणे : Pune Wagholi Crime News | होळी सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करणार्‍या वाघोली पोलिसांना मैदानात संशयास्पद रित्या थांबलेली रिक्षा आढळून आली. पोलिसांनी रिक्षाची झडती घेतली असता त्या रिक्षात गांजा आढळू आला़  पोलिसांनी रिक्षासह २ लाख १६ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

मोहम्मद जिशान अकबर अली अन्सारी Mohammad Jishan Akbar Ali Ansari (वय २८, सध्या रा. भावडी रस्ता, वाघोली, मुळ रा. कोतवाली देहात, जि. बिजनोर, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

वाघोली पोलिसांचे पथक २८ फेब्रुवारी रोजी गस्त घालत होते. त्या वेळी मोकळ्या मैदानात अन्सारी रिक्षासह थांबला होता. पोलिसांनी त्याला हटकले़ तेव्हा तो पळून जाऊ लागला. त्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या रिक्षाची झडती घेण्यात आली. तेव्हा त्यात ६ हजार ६८० रुपयांचा ३३४ ग्रॅम गांजा आढळून आला़ पोलिसांनी तो गांजा,  मोबाइल, रिक्षा असा २ लाख १६ हजार ६८० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

ही कामगिरी परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस कर्मचारी बाबासाहेब मोराळे, प्रदीप मोटे, मंगेश जाधव, सुनील कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, दीपक कोकरे, विशाल गायकवाड, दीपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे, बापू बेंद्रे यांनी केली आहे. 

You may have missed