Will Home Prices Rise in Pune and Pimpri-Chinchwad | पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये घरांच्या किमती वाढणार? रेडीरेकनर दरात 8 ते 10 टक्के वाढीचा प्रस्ताव
Will Home Prices Rise in Pune and Pimpri-Chinchwad | पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात घरखरेदी महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने शहर भागातील रेडीरेकनर दरात सरासरी ८ ते १० टक्के, तर ग्रामीण भागात ५ ते ७ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास २०२६-२७ या आर्थिक वर्षात घरांच्या किमतीत वाढ होऊ शकते.
राज्यात दरवर्षी १ एप्रिलपासून नवे रेडीरेकनर दर लागू केले जातात. मागील आर्थिक वर्षात ही वाढ सरासरी ३.८९ टक्के होती. मात्र, यंदा दरवाढ अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रेडीरेकनरचे दर वाढल्यास केवळ मुद्रांक शुल्क वाढणार नाही, तर सदनिका आणि जमिनींच्या मूळ किमतीवरही त्याचा थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे आता राज्य शासन या प्रस्तावावर किती टक्के वाढ मंजूर करते, याकडे घरखरेदीदारांचे लक्ष लागले आहे.
