Pune Crime News | पुणे : जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन करुन परत येत असताना दिवे घाटात ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील लहान मुलीसह वडिलांचा मृत्यु; लहान मुलगा जखमी, लातूर जिल्ह्यातील चालकाला अटक

Pune Accident News | Speeding car hits bike in Sangamwadi; Food delivery worker dies

पुणे : Pune Crime News |  जेजुरी खंडोबाचे देवदर्शन घेऊन परत येत असताना दिवे घाटात पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने त्यात ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने १२ वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यु झाला. जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. ८ वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे.

सुंदर कैलास गंगावणे (वय ३३), मुलगी अनन्या सुंदर गंगावणे (वय १२, दोघे रा. उंड्री पिसोळी, कात्रज कोंढवा रोड) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. सोहम गंगावणे (वय ८) हा जखमी झाला आहे.

याबाबत अश्विनी उत्तम पवार (वय ३०, रा. कमलविहार सोसायटी, धनकवडी) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन ट्रक चालक हनुमंत बाबुराव मलकापूरे Hanumant Baburao Malkapure (वय ३२, रा. नागेवाडी, ,ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मामेभाऊ सुंदर गंगावणे हे आपली मुलगी अनन्या व सोहम यांना घेऊन रविवारी खंडोबाच्या देवदर्शनासाठी जेजुरीला गेले होते. तेथून ते मध्यरात्री सव्वा बारा वाजता परत येत होते. दिवे घाटातील देवाची उरुळी येथे पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या अ‍ॅक्टीवा दुचाकीला धडक दिली. त्यात सुंदर गंगावणे यांच्या डोक्याला मार लागला. अनन्या गंगावणे ही ट्रकच्या मागील चाकाखाली सापडल्याने  तिचा जागीच मृत्यु झाला. सुंदर गंगावणे यांना जमलेल्या लोकांनी तातडीने ससून रुग्णालयात नेले. तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला. पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.