Pune Traffic Police Action | तीन दिवसात 1265 ट्रिपल सीट वाहनचालक जाळ्यात; 234 मॉडिफाईड सायलेन्सर, 852 वाहने जप्त करीत 51 लाखांचा दंड
पुणे : Pune Traffic Police Action | वाहतूक पोलिसांनी २७ ते २९ मार्च या तीन दिवसात संपूर्ण शहरात ट्रिपल सीट वाहन चालक, मॉडिफाईल सायलेन्सर असलेल्या बुलेट मोटारसायकल आणि ड्रिक अँड ड्राईव्ही यांच्याविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यात १२६५ ट्रिपल सीट चालकांवर कारवाई करण्यात आली. मॉडिफाईड बुलेट सायलेन्सर असलेल्या ३२० बुलेटवर कारवाई करुन त्यांचे मॉडिफाईड सायलेन्सर काढून जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी तीन दिवस राबविलेल्या या मोहीमेमध्ये एकूण ५ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान एकूण २३४ मॉडिफाईड सायलेन्सर आणि एकूण ८५२ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
ड्रॅक अँड ड्राईव्ह अंतर्गत शहरात वेगवेगळ्या ३० ठिकाणी नाकाबंदी पॉईट लावण्यात आले होते. या नाकाबंदीत दारु पिऊन वाहन चालविणार्या १८६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनांवर देखील कारवाई करण्यात आली. विविध नियमभंग प्रकरणातून तीन दिवसत एकूण ५१ लाख ५४ हजार २०० रुपये दंड वसुल करण्यात आला.
पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी सांगितले की, मॉडिफाईड सायलेन्सरचा वापर केल्याने ध्वनीप्रदुषण वाढून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. वाहन चालकांनी नियमांचे पालन करुन सुरक्षित व शांततामय वाहतूक व्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे. मद्यपान करुन वाहन चालविणे हा गंभीर व दंडनीय गुन्हा असून स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात घालू नये. दुचाकी वाहनांवर ट्रिपल सीटने प्रवास करणे हे कायद्याने दंडनीय उल्लंघन आहे. ट्रिपल सीट प्रवासामुळे अपघाताची शक्यता वाढते व स्वत:सह इतर रस्ते वापरणार्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो. सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
