Pune Crime News | पीएमपी प्रवासी तरुणीच्या पिशवीतून दोन लाखांची रोकड लंपास

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या एका तरुणीच्या पिशवीतून दोन लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना हडपसर परिसरात घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत हडपसर परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास फिर्यादी तरुणी हडपसर ते बालेवाडी दरम्यान पीएमपी बसने प्रवास करत होती. भेकराईनगर परिसरातील बसथांब्यावर मोठी गर्दी होती.

या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी तरुणीच्या पिशवीतून दोन लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याचा आरोप आहे. काही वेळानंतर पैसे गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने हडपसर पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

You may have missed