Pune Crime News | औषध वितरकांकडून कोट्यवधींची औषधे घेऊन फसवणूक करणार्‍या जयेश जैन याला आर्थिक गुन्हे शाखेने केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  सदाशिव पेठेतील घाऊक औषध वितरकांकडून उधारीवर औषधे घेऊन त्यांची कोट्यवधींची फसवणूक करणार्‍या दोघांपैकी एकाला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

जयेश वसंत जैन Jayesh Vasant Jain (वय ४२, रा. भक्तीपुजा अपार्टमेंट, महर्षीनगर, गुलटेकडी) असे या आरोपीचे नाव आहे. जयेश जैन आणि सोनाली लक्ष्मण गिरीगोसावी (रा. अर्चना कोहिनूर, ग्लोरी सोसायटी, महम्मदवाडी) यांच्यावर आतापर्यंत किमान ५ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात १८ कोटी रुपयांवरुन अधिकची फसवणूक करण्यात आली आहे.

याबाबत दिनेश सुभाष कर्नावट (वय ५१, रा. ठुबे पार्क, शिवाजीनगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा सदाशिव पेठेत सिनिअर एजन्सी या नावाने औषध विक्रीचा होलसेल व्यवसाय आहे. त्यांच्या दुकानातून सोनाली गिरीगोसावी हिचेकडून १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत २३ कोटी रुपयांच्या औषधांची ऑर्डर मिळाली होती. तिच्या ऑर्डरप्रमाणे त्यांनी मालाचा पुरवठा केला होता. त्याच दरम्यान सोनाली गिरीगोसावी हिने त्यांना सांगितले की, ती त्यांच्याकडून ऑर्डरप्रमाणे घेतलेला माल पुढे जयेश जैन यास देते. तो माल जयेश जैन हा पुढे एक्सपोर्ट व शासकीय रुग्णालयाला पुरवितो़ त्यांची या दोघांनी ३ कोटी ५४ लाख ५५ हजार ३२९ रुपयांची फसवणूक केली आहे. त्याचप्रमाणे निलेश सोहनलाल सोनिगिरा यांची या दोघांनी  कोट्यावधींची फसवणूक केली आहे. या प्रकरणात जयेश जैन याने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. नुकताच त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्याला अटक केली आहे.

You may have missed