Pune Crime News | गणेश मंडळांची आरास पाहण्यासाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणार्‍या टोळीला फरासखाना पोलिसांनी केले जेरबंद

Pune Crime News | Faraskhana police caught a gang that was stealing gold jewelry from women who came to see Ganesh Mandal decorations

पुणे : Pune Crime News | गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणार्‍या टोळीला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून अडीच लाख रुपयांचे १८ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

आरती आकाश चव्हाण Aarti Akash Chavan (वय २२, रा. मिठमिठा, जि. छत्रपती संभाजीनगर), सुवर्णा रोहित शिंदे Suvarna Rohit Shinde (वय ३५) आणि रोहित ऊर्फ दीपक शिंदे Rohit alias Deepak Shinde (वय ४०, दोघे रा. वरदडा, ता. चिखली, जि. बुलढाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेत असताना २० सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दोन वाट्या व चार मणी असलेले मंगळसुत्र व आणखी एका महिलेचे ३ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसुत्र चोरीला गेले होते. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस हवालदार गजानन सोनुने व अजिम शेख यांना बातमीवरुन दोन महिला व एक पुरुष यांची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी तिघांना पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिने व लोखंडी कटर मिळून आला. त्यांना अटक करुन चौकशी केल्यावर त्यांच्याकडून २ लाख ५९ हजार १४० रुपयांचे १८ ग्रॅम सोन्याचे दागिने व लोखंडी कटर जप्त करण्यात आला आहे. चोरीला गेलेला १०० टक्के माल हस्तगत करण्यात आला़. त्यांच्याकडून फरासखाना पोलीस ठाण्याकडील दोन व विश्रामबाग पोलीस ठाण्यातील ३ असे ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस अंमलदार महेश राठोड तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप देशमाने, पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार गजानन सोनुने, अजिम शेख, महेश राठोड, नितीन जाधव, नितीन तेलंगे, प्रविण पासलकर, अमोल अवाड, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, चेतन होळकर, सुमित खुट्टे, प्रशांत पालांडे, कुंडे, फुपाने यांनी केली आहे.

You may have missed