Pune Accident News | पुणे : राजाराम पुलाजवळ सिमेंट मिक्सरच्या धडकेत दुचाकीस्वार 47 वर्षीय महिलेचा मृत्यू

Pune Accident News | Pune: A 47-year-old woman on a motorcycle died after being hit by a cement mixer near Rajaram bridge

पुणे : Pune Accident News | सिमेंट मिक्सरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना राजाराम पूल परिसरात घडली. या प्रकरणी वारजे पोलिसांनी सिमेंट मिक्सर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सुषमा संदेश पोखरकर (वय 47, रा. रॉयल हाईट, आनंदनगर, सिंहगड रस्ता) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांचे पती संदेश पोखरकर (वय 50) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुषमा पोखरकर या 23 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास दुचाकीवरून कर्वेनगर परिसरातून सिंहगड रस्त्याकडे जात होत्या. राजाराम पुलाजवळ एका सिमेंट मिक्सरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

या अपघातात पोखरकर गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या प्रकरणी वारजे पोलिसांनी सिमेंट मिक्सर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, शहरात दिवसा सिमेंट मिक्सर, टँकर आणि डंपरसारख्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध असतानाही अशा वाहनांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचा प्रश्न या घटनेनंतर पुन्हा ऐरणीवर आला आहे.

You may have missed