Pune Crime News | पतीच्या अनैतिक संबधाच्या संशयावरुन होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; चतु:श्रृंगी पोलिसांनी पतीला केले अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | पतीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरुन विचारणा केल्याने होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने औषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पतीला अटक केली आहे.

ज्योती मुकेश विटकर (वय २६, रा. वडारवाडी) असे विवाहितेचे नाव आहे. मुकेश नागेश विटकर Mukesh Nagesh Vitkar (वय ३०, रा. जय मित्रमंडळाजवळ, वडारवाडी) असे पतीचे नाव आहे. याबाबत ज्योती हिच्या भावाने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती आणि मुकेश विटकर यांचा २०१९ मध्ये विवाह झाला होता. गेल्या काही वर्षांपासून मुकेश विटकर याचे विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याचा संशय होता़ त्यावरुन गेल्या २ वर्षांपासून त्यांच्यात वाद निर्माण होऊ लागला. मुकेश याने ज्योती हिला वारंवार शारीरीक व मानसिक त्रास देत होता. या छळाला कंटाळून तिने २६ सप्टेंबर रोजी विषारी औषध प्राशन केले. तिला रत्ना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरु असताना तिचा मृत्यु झाला. पोलिसांनी पतीला अटक केली असून न्यायालयाने तपासासाठी एक दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार तपास करीत आहेत.

You may have missed