Pune Crime News | पुणे : येरवडा परिसरातील जलतरण तलावात क्लोरीनचे प्रमाण वाढल्याने दहा मुलांना त्रास

Pune Crime News | Pune: Ten children suffer health issues due to high chlorine levels in a swimming pool in the Yerwada area.

पुणे : Pune Crime News | येरवडा परिसरातील हाउसिंग बोर्ड येथील मोझे जलतरण तलावात क्लोरीनचे प्रमाण कथितरीत्या वाढल्याने सुमारे 10 मुलांना त्रास झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

त्रास जाणवू लागलेल्या मुलांना तातडीने उपचारासाठी शास्त्रीनगर चौकातील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी पाच मुलांना उलट्यांचा त्रास झाल्याने डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या मुलांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. तलावातील पाण्यात क्लोरीनचे प्रमाण अधिक झाल्याने हा त्रास झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या काही मुलांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले, तर काहींना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त चुलुमुला रजनीकांत यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. तलावातील क्लोरीनचे प्रमाण नेमके कशामुळे वाढले, याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे.

You may have missed