Satara Accident News | सातारा-लातूर महामार्गावर भीषण अपघात! एसटी बस आणि एम80 च्या धडकेत दोघांचा मृत्यू; 29 वर्षीय तरुणाचा संसार उद्ध्वस्त

Satara Accident News | Horrific accident on Satara-Latur highway! Two killed in a collision between an ST bus and an M80; 29-year-old man's family devastated

सातारा : Satara Accident News | सातारा-लातूर राज्य मार्गावरील शिंदेवाडी येथे एसटी बस आणि एम८० दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातामुळे खटाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या अपघातात किरण दिलीप घाडगे (वय २९) आणि राजाराम सावंत (वय ७०) या दोघांचा मृत्यू झाला. किरण घाडगे हे खटाव येथील रहिवासी असून भंगार व्यवसाय करत होते. अपघाताच्या वेळी दोघेही एम८० दुचाकीवरून प्रवास करत होते.

अवघ्या २९ व्या वर्षी किरण घाडगे यांचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे घाडगे कुटुंबीयांसह खटाव आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

You may have missed