Pune Crime News | बाणेरमधील पॅनक्लब रोडवर तरुणाला लुटणार्या टोळीला बाणेर पोलिसांनी केले गजाआड
पुणे : Pune Crime News | बाणेर परिसरात पहाटे घरी जाणार्या एका तरुणाला अडवून त्याच्याकडील सोन्याचे ब्रेसलेट, सोनसाखळी तसेच रोकड असा ऐवज लुटणार्या चौघांना बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.
पवन रामदास पारगे Pawan Ramdas Parge (वय १८, रा. धायरी फाटा, सिंहगड रस्ता), साहिल बाळासाहेब मरगळे Sahil Balasaheb Margale (वय १९, रा. कोल्हेवाडी, खडकवासला, सिंहगड रस्ता), विशाल बाळासाहेब झोडगे Vishal Balasaheb Zodge (वय १८, रा. कदम वाडा, धायरी गाव), आदित्य हरिश्चंद्र कोळकर Aditya Harishchandra Kolkar (वय १८, रा. शिंदे चाळ, गारमाळ, धायरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लब रस्त्याने १ ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वादोन वाजता फिर्यादी घरी जात होते. त्यांच्या दोन्ही हातात बॅगा होत्या. त्या वेळी चोरट्यांनी त्यांना अडवले. त्यांना धमकावून हातातील सोन्याचे ब्रेसलेट, सोनसाखळी काढून घेतली. त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने १८ हजार ९९९ रुपये घेतले. आरोपी दुचाकीवरुन पसार झाले. सीसी टी व्हीमध्ये ५ आरोपी आढळून आल्याने पोलिसांनी गुन्ह्यामध्ये दरोड्याचे कलम वाढविले.
पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. लूटमार करणारे चोरटे धायरी भागातील असल्याची माहिती तपासात मिळाली. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. या प्रकरणात चौघांसह एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोकड जप्त केली आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक विजय खिल्लारे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश रायकर, गणेश गायकवाड, बाबा आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, संजय दहिभाते, शरद राऊत, अतुल इंगळे, प्रदिप खरात, गजानन अवातिरक, स्वप्नील मराठे, गणेश भोईने, समीर पवार यांनी केली आहे.
