ACB Trap On Police Havaldar | तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी लाच घेणारा पोलीस हवालदार जाळ्यात

acb logo

लातूर : ACB Trap On Police Havaldar | तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी व प्रकरण मिटविण्यासाठी ५ हजारांची लाच अगोदर घेऊन ४५ हजारांच लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडले. (Latur ACB Trap Case)

https://www.instagram.com/p/DA-P_CJpvZQ

शिवाजी मोतीराम गुंडरे (वय ५५, रा. नागोबा नगर, टेंभुर्णी रोड, अहमदपूर, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे या हवालदाराचे नाव आहे. याबाबत एका ३५ वर्षाच्या महिलेने तक्रार दिली होती. तक्रारदार यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज दाखल होता. त्याची चौकशी हवालदार शिवाजी गुंडरे याच्याकडे देण्यात आली होती. त्यावर कारवाई न करण्यासाठी व प्रकरण मिटवण्यासाठी तसेच जबाबाची प्रत देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे हवालदार शिवाजी गुंडरे याने ५० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यापैकी ५ हजार रुपये अगोदर देण्यात आले होते.

तरीही तो उर्वरित रक्कम देण्याची मागणी करीत होता. तेव्हा तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली. १० ऑक्टोबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता हवालदार गुंडरे यांनी कारवाई न करण्यासाठी व प्रकरण मिटविण्यासाठी राहिलेले ४५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. अहमदपूर पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ तक्रारदार यांच्याकडून ४५ हजार रुपये स्वीकारताना शिवाजी गुंडरे याला रंगेहाथ पकडण्यात आले. गुंडरे याला अटक करण्यात आली असून अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली तपास करीत आहेत. (Latur Bribe Case)

https://www.instagram.com/p/DA-NipwJAV9

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संतोष बर्गे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

https://www.instagram.com/p/DA8uAzBJgSY

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed