Aditya Thackeray On Narayan Rane | आदित्य ठाकरेंची राणेंवर बोचरी टीका म्हणाले, ” आपला मोर्चा होता, पण काही चिंधी चोर…”
सिंधुदुर्ग : Aditya Thackeray On Narayan Rane | छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा (Malvan Shivaji Maharaj Statue) कोसळल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी (Mahavikas Aghadi Leaders) राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी केली. यावेळी ठाकरे गटाचे नेते (Shivsena UBT) आदित्य ठाकरे, जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासह आदी नेत्यांचा सहभाग होता.
मात्र, याचवेळी भाजपा नेते नारायण राणे आणि नितेश राणे (Nitesh Rane) हे देखील राजकोट किल्ल्यावर आल्यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले. बराचवेळ त्याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद निवाळला.
दरम्यान महाविकास आघाडीच्या सभेत बोलताना आदित्य ठाकरेंनी नारायण राणेंना खोचक टोला लगावला आहे. खरं तर आज आपला मोर्चा होता. मात्र, या मोर्चामध्ये काही चिंधी चोर समोरून आले, अशा खोचक शब्दांत आदित्य ठाकरेंनी नारायण राणे यांच्यावर टीका केली.
आदित्य ठाकरे म्हणाले, ” खरंतर आज आपला मोर्चा होता. मात्र, या मोर्चामध्ये काही चिंधी चोर समोरून आले. आता श्रावण सुरु आहे अन्यथा त्यांच्या खिशातून कोंबड्याही काढल्या असत्या. जाऊद्या मी त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही. आज त्यांचा बालिशपणा होता.
आता या ठिकाणचे स्थानिक खासदार कसे निवडून आले हे देखील सर्वांना माहिती आहे. ही घटना घडल्यानंतर येथील खासदार चार दिवसांनी आले. मग चार दिवस खासदार कुठे होते? ते आजच कसे आले?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, ” राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर आम्ही विचार केला
की, या ठिकाणी आले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली पाहिजे.
कारण आपण महाराष्ट्रातील माणसं आहोत. भारतीय जनता पक्षाने गेल्या १० वर्षात जे-जे काम केले. त्या सर्व कामांना गळती लागली.
भाजपाने केलेलं असं कोणतंही काम नाही की त्या ठिकाणी गळती लागली नाही.
अयोध्येतील राम मंदिर असो किंवा नवीन संसद भवन असो.
नवीन संसद भवनालाही गळती लागली एवढंच नाही तर दिल्ली विमानतळाचं छत देखील कोसळलं”,
असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी भाजपावर केला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”
Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून