Ajit Pawar NCP | राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी अजित पवारांच्या पक्षाकडून 3 नावे निश्चित?
मुंबई : Ajit Pawar NCP | विधान परिषदेच्या १२ राज्यपाल नियुक्त जागा भरण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्यात याविषयी गुरुवारी रात्री खलबतं झाल्याची माहिती मिळत आहे.
या १२ मध्ये भाजपला ६, शिंदे सेनेला ३, तर अजित पवार गटाला ३ जागा मिळणार असल्याची माहिती आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच या नावांना मान्यता देऊन राज्यपालांकडे ती मान्यतेसाठी पाठविली जातील,
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपल्या वाट्याला आलेल्या तीन जागांवरील नावे निश्चित केल्याचे समजते. यामध्ये राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी खासदार आनंद परांजपे आणि सिद्धार्थ कांबळे यांचा समावेश असल्याची माहिती आहे.
राज्यपाल नियुक्त १२ जागांचा तिढा बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे.
महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपालांनी या यादीच्या मंजुरीला विलंब केल्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले होते.
त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या आधी या जागांची नियुक्ती व्हावी,
यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात असल्याचे दिसत आहे. (Ajit Pawar NCP)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा