Ajit Pawar On Nilesh Lanke | …म्हणून निलेश लंके मविआत गेले; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Ajit Pawar-Nilesh Lanke

मुंबई : Ajit Pawar On Nilesh Lanke | मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी निलेश लंके यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. निलेश लंके यांच्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, ” निलेश लंकेंना संधी देण्यासाठी मीच पुढाकार घेतला होता. लंके माझ्याकडून लोकसभा लढविण्यास तयार होते. त्यांना लोकसभा हवी होती, तिथे भाजपाचे खासदार (BJP MP) असल्याने भाजपाने लंकेंसाठी जागा सोडली नाही. नगरची जागा धोक्यात असल्याची कल्पना दिली होती. भाजपाने ऐकले नाही. पालकमंत्र्यांनी त्रास दिला यामुळे त्यांच्यासाठी काम करणार नाही अशी लंकेंनी भुमिका घेतली होती. जवळच्या लोकांच्या क्रशर आणि खाणी बंद केल्याने आपल्याला फटका बसेल असे त्यांना वाटत होते, यामुळे लंके शरद पवारांसोबत (Sharad Pawar NCP) गेल्याचे अजित पवार म्हणाले.

तसेच लोकसभेला एकट्या भाजपच्या सर्व्हेवर जागावाटप झाले आता तिन्ही पक्ष सर्व्हे करणार असल्याचे अजित पवारांनी जाहीर करत विधानसभेचे जागावाटप कसे होणार याबाबत माहिती दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election 2024) तिन्ही पक्ष आपापला सर्व्हे करतील. तिघांचेही सर्व्हे समोर ठेवले जातील. जे दोन सर्व्हे एका बाजूला जातील तिथे राष्ट्रवादी आपला उमेदवार देईल असे अजित पवार गंमतीने म्हणाले. यावर प्रफुल्ल पटेल यांनी आपणही सर्व्हे करणार असल्याचे म्हंटले. तसेच ज्यांचे दोन सर्व्हे एकसारखे येतील ते मान्य करून त्यांचा उमेदवार देणार आहोत असे स्पष्ट केले आहे.

२०१९ ला जिंकलेल्या ५४ जागांवर दावा करणार. या जागांवर नवाब मलिक यांचाही समावेश असणार.
तसेच २०१९ मध्ये जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार पुढे होते त्या जागांवरही दावा करणार आहोत, असे अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादीचे आमदार परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चावर अजित पवारांनी आपली भुमिका मांडली आहे.
माझ्यासोबतचे आमदार जर परत गेले तर हरकत नाही. नव्यांना उभे करू, आमच्याकडे सध्या अनेक उमेदवार आहेत.
अनेकांना संधी दिली ते चांगले काम करत आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune Expressway Accident | पंढरपूरला निघालेल्या बसचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 5 ठार, 42 जखमी

ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक

Police Sub Inspector (PSI) Dismissed In Pune | पुणे : 3 लाखांची लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेतून बडतर्फ