Alephata Pune Crime News | बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून दाजीचा खून, उज्जैनला पळून जाणाऱ्या मेव्हण्याला अटक

Murder-Arrest

आळेफाटा : Alephata Pune Crime News | बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीच्या डोक्यात दगड घालून खून करून उज्जैन, मध्य प्रदेश येथे पळून जाणाच्या तयारीत असणाऱ्या मेव्हण्याला आळेफाटा पोलिसांनी (Alephata Police) अटक केली आहे. कैलास महादू भंडलकर (वय ३२,रा. मोरदरा, वडगाव आनंद,जुन्नर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Alephata Pune Murder Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता.१०) पुणे-नाशिक महामार्गावरील (Pune Nashik Highway) आळे (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल फाऊंटनच्या पाठीमागे मोरदरा रोडलगत आतमध्ये एक पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला होता. मृत व्यक्तीची नोंद आळेफाटा पोलिसात दाखल केली होती. आरोपीची ओळख पटविण्यासाठी तसेच माहिती काढण्यासाठी पोलिस पथके तयार करण्यात आली होती.

मृत व्यक्तीचे कैलास भंडलकर असे नाव आहे. मृत व्यक्तीला कपड्यावरून, चप्पलवरून त्याची पत्नी नाजुका कैलास भंडलकर हिने ओळखले. त्यानंतर मृत व्यक्तीचे शवविच्छेदन प्राथमिक आरोग्य केंद्र आळे याठिकाणी झाले. त्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये कोणत्या तरी टणक हत्याराने मारल्याने त्याचा मृत्यू झाला, असा अहवाल प्राप्त झाल्याने त्याच्या पत्नीने दिलेल्या तकारी वरून आळेफाटा पोलिसात गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याच्या अनुषंगाने वेगवेगळी तपास पथके तयार करून तपास सुरू केला असता, आरोपी उज्जैन मध्य प्रदेश येथे पळून जाणार आहे, अशी माहिती पोलिस पथकास मिळाली असता पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेतले.

गणेश दादाभाऊ मदने (वय २४, रा. रामवाडी, खापरवाडी ता. जुन्नर) असे आरोपीचे नाव आहे.
त्याच्याकडे या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता, त्याने सांगितले की,
“कैलास महादू भंडलकर हा माझ्या बहिणीला त्रास देत होता. तसेच त्याला समजावून सांगितले, तरीपण तो ऐकत नव्हता.
यामुळे मी त्यास ३१ जुलै रोजी दुपारी ३:१५ वाजता सुमारास हॉटेल फाऊंटनच्या पाठीमागे मोरदरा रोडलगत
आतमध्ये जंगलामध्ये नेवून माझ्या साथीदारांच्या मदतीने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला”,
अशी कबुली दिल्याने पोलिसांनी त्याला अटक केली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”

Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून

Malabar Gold & Diamonds | मलाबार गोल्ड अँड डायमंड्सला 2023-24 साठी प्रतिष्ठित ‘इंडिया गोल्ड कॉन्फरन्स’ पुरस्काराने केले सन्मानित

Chief Engineer Rajendra Pawar | मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार प्रदान