Amit Shah-BJP Executive Meeting In Pune | महायुतीत मुख्यमंत्री पद भाजपाकडे! अमित शहा यांचे सूचक वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा

Amit Shah

पुणे : Amit Shah-BJP Executive Meeting In Pune | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर भाजपचे महाअधिवेशन पुण्यात पार पडत आहे. या अधिवेशनात उपस्थितांना मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यात आगामी मुख्यमंत्री कोण? याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), आशिष शेलार (Ashish Shelar), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महायुतीचे मुख्यमंत्री कोण?, यावर भाष्य केले नाही.

मात्र, गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणात विधानसभेच्या नेतृत्वाबाबत सूचक इशारा दिला. ‘महायुती सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत येणार हे मला स्पष्ट दिसत आहे. भाजपच्या नेतृत्त्वातच महायुतीचे सरकार (Mahayuti Govt) असणार’ असे अमित शाह म्हणाले. (Amit Shah-BJP Executive Meeting In Pune)

“लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकला विरोधी पक्ष काँग्रेस पराभूत झाला.
माझ्या राजकीय जीवनात मी विजयी झाल्यावर अहंकार निर्माण झालेले पाहिले आहेत.
मात्र, पराभूत होऊन जगात अहंकार निर्माण झालेला राहुल गांधी (Rahul Gandhi) हे एकमेव उदाहरण आहे.
त्यांचा अहंकार उतरवण्यासाठी प्रचंड बहुमताने महाराष्ट्र, हरियाणा, झारखंडमध्ये सत्ता आणायची आहे”,
असे आवाहन अमित शहा यांनी केले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Attack On Digital Content Creator Lady | पुण्यामध्ये भररस्त्यात महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करणारा अटकेत

BJP Executive Meeting In Pune | केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत पुण्यात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशन सुरु

Manorama Khedkar | पोलीस कोठडीत देखील पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकरचा रुबाब कमी होईना! जेवण बेचव असल्याची तक्रार

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत भाजपच ‘दादा’; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 40 जागात गुंडाळणार?

You may have missed