Amol Balwadkar Foundation | रेकॉर्ड ब्रेक गर्दी… तरुणाईचा जल्लोष ! अमोल बालवडकर फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात अवघे कोथरूडकर न्हाऊन निघाले

Amol Balwadkar

कोथरूड (पुणे) – Amol Balwadkar Foundation | ‘गोविंदा आला रे आला’, ‘अरे बोल बजरंग बली की जय’चा जयघोष आणि सोबतीला डिजेच्या तालावर रिमझिम बरसणाऱ्या पावसात कोथरूडमध्ये तरुणाईचा जल्लोष पहायला मिळाला. पुणे, मुंबई, बारामती, ठाणे येथून आलेल्या गोविंदा पथकांनी दहीहंडीसाठी (Dahi Handi 2024) कडक सलामी दिली. त्यानंतर रात्री सव्वा नऊनंतर श्वास रोखून धरणारा तो क्षण आला. एकावर एक असे गोविंदा पथकांचे सहा ते सात थर चढू लागले. सात थर देत घाटकोपर मुंबईच्या श्रीकृष्ण गोविंदा पथकाने हंडी फोडली. 

बालेवाडी हायस्ट्रीट ग्राऊंड (Balewadi High Street Ground) येथे अमोल बालवडकर फाऊंडेशनतर्फे आयोजित दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला. यावेळी तब्बत ७२ वर्षांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मी. रायफल शूटिंग स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून दिल्याबद्दल कोल्हापुर महाराष्ट्राचे सुपुत्र स्वप्नील कुसळे (Swapnil Kusale) यांचा  समस्त पुणेकर आणि कोथरूडकरांच्या (Kothrudkar) वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. फाऊंडेशनच्या वतीने ५ लाख रुपयांचा धनादेश व मानपत्र देवुन कुसळे यांचा सन्मान करण्यात आला. 

अमोल बालवडकर फाउंडेशनतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या दहीहंडी उत्सवाचे कोथरूड परिसरात नेहमीच आकर्षण असते.  त्यामुळे तरुणाईची या उत्सवाला मोठी गर्दी असते. यंदाच्या दहीहंडीत रेकॉर्ड ब्रेक गर्दी दिसून आली. पुणे, मुंबई, बारामती, ठाणे अशा विविध भागातील गोविंदा पथकांनी सहभागी होत सलामी दिली. यंदाच्या दहीहंडी मध्ये डीजे व रॅपर यांच्या उपस्थितीने तरुणांमध्ये अधिकच उत्साह संचारला. डीजे कारटेक्स ए- यो, मायरा व अक्षय हे देखील दहीहंडीचे आकर्षण ठरल्याचे पाहायला मिळाले. तर घाटकोपर मुंबईच्या श्रीकृष्ण गोविंदा पथकाने यंदा हंडी फोडली.

 कोथरुड मतदार संघातुन तसेच पुणे शहरातील विविध भागातुन नागरिक, तरुण – तरुणी या उत्सवात  सहभागी झाले.
अमोल बालवडकर फाऊंडेशनचे सर्व सभासद यावेळी उपस्थित होते. (Amol Balwadkar Foundation)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”

Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून

Malabar Gold & Diamonds | मलाबार गोल्ड अँड डायमंड्सला 2023-24 साठी प्रतिष्ठित ‘इंडिया गोल्ड कॉन्फरन्स’ पुरस्काराने केले सन्मानित

Chief Engineer Rajendra Pawar | मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार प्रदान

You may have missed