Amol Balwadkar On PMC Administration | रुग्णांच्या सेवेसाठी बाणेर येथील हॉस्पिटल सुरु करा अन्यथा आंदोलन करू; भाजप नेते अमोल बालवडकरांचा इशारा

Amol Balwadkar

पुणे : Amol Balwadkar On PMC Administration | भाजप नेते (BJP Leader) अमोल बालवडकर शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष असताना केलेल्या प्रयत्नांतून २०१९ मध्ये रुग्णांच्या सेवेसाठी बाणेर येथे ४० हजार स्क्वेअर फूट जागेत भव्य हॉस्पिटल (Hospital In Baner) बांधण्यात आले होते. यामुळे परिसरातील गोरगरीब नागरिकांना मोठा दिलासा मिळणार होता. (Baner-Balewadi News)

https://www.instagram.com/reel/C_fv-PPJNco/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अद्यापही सदरील रुग्णालय सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. परिसरातील नागरिकांना उपचार घेण्यासाठी दूरवरच्या रुग्णालयात जावे लागत आहे.

आपत्कालीन परिस्थितीत खाजगी दवाखान्यात जर रुग्णाला दाखल केले तर दिवसाला ५० हजार ते १ लाख इतकी रक्कम मोजावी लागते. मोलमजुरी करून पोट भरणारे नागरिक एवढा खर्च कसा उचलणार? याचा विचार करून हे हॉस्पिटल उभे करण्यात आले. मात्र, मुख्य ठराव मंजूर होऊनही प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच या परिसरातील एका मुलीला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली असता बालवडकर यांनी ॲम्बुलन्स उपलब्ध करून तिला जुपिटर हॉस्पिटल येथे ॲडमिट केले आणि तिचा खर्च उचलला. परंतु प्रकृतीची चिंता अनेकांना भासत असते, त्यांनी पैसे आणावे तरी कुठून? हा प्रश्न उपस्थित होत आहे,

प्रशासनाने बाणेर येथील रुग्णालय सुरू करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अन्यथा यावरून मोठे आंदोलन करण्यात येईल,
असा इशारा अमोल बालवडकर यांनी दिला आहे. (Amol Balwadkar On PMC Administration)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Gultekdi Pune Crime News | पुणे : गुलटेकडीमध्ये मध्यरात्री तरुणावर वार करुन निर्घुण खुन;
भावाला वाचवायला गेला आणि जीव गमावला, 5 जणांना अटक

Pune Crime News | सुधीर गवस खुनाचा बदला घेण्यासाठी खूनाचा प्रयत्न करुन फरार झालेला गुंड जेरबंद (Video)

You may have missed