Bachchu Kadu On Ajit Pawar | ‘अजित पवार काही दिवसात शरद पवारांकडे दिसतील’, बच्चू कडूंचे मोठे वक्तव्य

मुंबई: Bachchu Kadu On Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार काही आमदारांना घेऊन महायुती सरकारमध्ये (Mahayuti Govt) सहभागी झाले. मात्र महायुतीत अजित पवारांना घेऊन सर्वकाही आलबेल आहे असे म्हणता येत नाही. कारण महायुतीतील मित्रपक्षातील नेते अजित पवारांना सातत्याने लक्ष्य करीत आहेत. मागेच संघानेही अजित पवारांवरून आक्षेप घेतला होता.
त्यामुळे अजित पवार महायुतीत राहतात की नाही यावरून चर्चा सुरु असतानाच आता आमदार बच्चू कडू यांनी अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य केले आहे.”अजित पवार यांचे अर्ध्यापेक्षा जास्त आमदार शरद पवार गटात (Sharad Pawar NCP) जातील”, असा दावा त्यांनी केला.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आमदार बच्चू कडू यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल मोठे विधान केले.”आगामी काळात अजित पवार यांचे अर्ध्याहून अधिक आमदार हे शरद पवार गटात जातील. काही दिवसांनी अजित पवारही तिकडे दिसू शकतात. त्यांना कुणीही अडवलेले नाही. शेवटी हे राजकारण आहे. कधी कुणाच्या पारड्यात जाऊन बसायचे आणि कुणाबरोबर राहायचे, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे”, असे बच्चू कडू म्हणाले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात
Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”
Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली