Ban On Laser Lights-Beam Lights In Pune | बीम लाईट व लेझर लाईट वापरणार्या पदमजा मित्र मंडळ ट्रस्टवर गुन्हा दाखल; ध्वनी प्रदुषणाचे 18 गुन्हे दाखल
पुणे : Ban On Laser Lights-Beam Lights In Pune | दही हंडी उत्सवात (Dahi Handi 2024) प्रखर बीम लाईट व लेझर लाईट वापरण्यास बंदी असताना ते वापरणार्या पदमजा मित्र मंडळ ट्रस्ट दहीहंडी उत्सव समितीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी दहीहंदी उत्सवात ध्वनी प्रदुषण करणार्या १८ मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे़ त्यात मंडळांचे अध्यक्ष आणि स्पीकर चालकावर गुन्हे दाखल केले गेले आहेत.
सहकारनगर येथील शारदाबाई गोविंदराव पवार व्यायामशाळेसमोर पदमजा मित्र मंडळ ट्रस्ट दहीहंडी उत्सव समितीने दहीहंडी उभारली होती. त्यात बंदी असताना प्रखर बीम लाईट व लेझर लाईटचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे मंडळाचे आयोजक सागर गौतम उघडे (रा. मोरे वसाहत, पुणे सातारा रोड), अध्यक्ष विनायक विजय मोहिते, उपाध्यक्ष राकेश दत्तू मणेरे, सचिव दिगंबर मधुकर मोहिते यांनी श्री गणेश लाईटचे मालक गणेश दत्तात्रय डांगे (वय २३, रा. शिवरोली पूलाची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्या मालकीचे प्रखर बीम लाईट व लेझर लाईट दहीहंडी मंडळासाठी लावून सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहीहंदी उत्सवात ध्वनी प्रदुषणाच्या मर्यादेचे उल्लंघन केलेल्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १२ मंडळे आणि स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ६ मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. या सर्वांचे डी जेचे आवाज १०० डेसिबलच्या पुढे होते. अन्य पोलीस ठाण्यांमध्येही गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु आहे. (Ban On Laser Lights-Beam Lights In Pune)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा