Baramati Assembly Constituency | अजित पवार बारामतीतून लढणार हे जवळपास निश्चित; मतदारसंघात शरद पवारांकडून नवी खेळी?

Ajit Pawar-Sharad Pawar

बारामती: Baramati Assembly Constituency | लोकसभा निवडणुकीदरम्यान युगेंद्र पवार (Yugendra Pawar) राजकारणात चांगलेच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान बारामतीतून अजित पवारांच्या (Ajit Pawar) विरोधात युगेंद्र पवार असतील अशी चर्चा होती. मात्र आता अजित पवारांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून (Sharad Pawar NCP) नेमकं कोण लढणार याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.

https://www.instagram.com/p/DA71QCJpZ4P

शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. असे असताना शरद पवारांच्या पक्षाकडून मात्र बारामतीसाठी अद्याप एकही इच्छुकाने मुलाखत दिलेली नाही. त्यामुळे बारामतीमध्ये अजित पवार यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशातच शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता असल्याची चर्चा देखील बारामतीमध्ये रंगली आहे.

https://www.instagram.com/p/DA742QEJvWD

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्यासाठी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरातून १ हजार ६८० इच्छुकांनी अर्ज केले आहेत. त्यामधील १ हजार २८० जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. बारामतीसाठी कोणीही मुलाखत दिलेली नाही.

https://www.instagram.com/p/DA79178psxU

मुंबई आणि कोकणातील ४०० इच्छुकांच्या मुलाखती आजपासून मुंबईत होणार आहेत.
बारामतीतून अजित पवारांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे ‘तुतारी’ हाती (Tutari) घेऊन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र पक्षाकडून घेण्यात आलेल्या मुलाखतीस ते उपस्थितच राहिले नाहीत. त्यामुळे आता बारामतीमध्ये शरद पवार गटाकडून कोणाला उमेदवारी देण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://www.instagram.com/p/DA7x4zvpCfZ

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed