Bhor Assembly Election 2024 | भ्रष्ट्राचाराने बरबटलेल्या राजगड सरकारी साखर कारखान्याला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू – शंकर मांडेकर

Shankar Mandekar

पुणे : Bhor Assembly Election 2024 | भ्रष्ट्राचाराने बरबटलेल्या राजगड सरकारी साखर कारखान्याला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन भोर-राजगड-मुळशी मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर (Shankar Mandekar) यांनी आज दिले. (Bhor Assembly Election 2024)

राजगड कारखान्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे. कारखान्याच्या कारभाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे कारखाना बंद पडला आहे. त्यामुळे १५५ कामगारांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा कारखाना दहा वेळा विकला तरी तोटा भरून निघणार नाही.

कारखान्याच्या कारभाराऱ्यांनी शेतकऱ्यांना कधीही वेळेवर पैसे दिले नाहीत. इतर कारखान्यांपेक्षा कमीच दर दिला. ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे, असाही आरोप मांडेकर यांनी केला.

महायुतीचे सरकार आल्यावर या कारखान्याला उर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न करू.
आमचे नेते अजितदादा पवार यांच्या सहकार्याने कारखाना कसा सुरू होईल व कामगारांची देणी
कशी देता येतील यासाठी प्रयत्न करू, असेही मांडेकर यांना सांगितले.

गेल्या ४० वर्षात हा कारखाना सुधारला नाही. एका वर्षी पाऊस नसताना साखर पाण्याने भिजल्याचे
दाखवून मोठा गैरव्यवहार केला गेला, यांचे उत्तर गरीब शेतकऱ्यांना द्यावे लागेल,
असा घाणाघातही त्यांनी केला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Rashmi Shukla | राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरुन हटवलं; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘उमेदवार द्यायचा नाही आता कोणाला पाडायचं ते पाडा’, मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; म्हणाले – ‘गनिमी काव्याने समाजाची ताकद दाखवू’

Pune Politics News | इच्छुकांची नाराजी दूर झाली पण त्यांच्यासाठी जीव तोडून काम करणारे कार्यकर्ते अद्याप संतप्तच?

Sunil Tatkare On Jayant Patil | सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा; म्हणाले – ‘अजित दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर…’

Devendra Fadnavis On Jayant Patil | “सिंचन घोटाळ्यावरून फडणवीसांनी अजित पवारांना ब्लॅकमेल केलं”, जयंत पाटलांचा मोठा आरोप, फडणवीस म्हणाले,…

You may have missed