Chandrakant Patil Felicitated By Gaja Marne | पुणे: कुख्यात गुंड गजा मारणेकडून चंद्रकांत पाटलांचा सत्कार; राजकीय वर्तुळात चर्चा
पुणे : Chandrakant Patil Felicitated By Gaja Marne | काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील अनेक नेत्याचे गुंडांसोबत फोटो पाहायला मिळाले आहेत. शिवाय अनेक राजकारणी मंडळींनी कुख्यात गुंडांकडून सत्कारही स्वीकारले आहेत. खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याच्याकडून सत्कार स्वीकारला होता. (Gangster Gaja Marne)
त्यानंतर लंकेंवर टीका झाल्यानंतर गजा मारणेची पार्श्वभूमी माहिती नसल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान आता भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनीही गजा मारणे कडून सत्कार स्वीकारला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांवरही विरोधकांकडून टीका केली जाण्याची शक्यता आहे.
पुण्यातील कोथरूड (Kothrud) परिसरात आयोजित एका दहीहंडी कार्यक्रमात हा सत्कार सोहळा पार पडला. पुष्पगुच्छ देऊन गजा मारणे याने चंद्रकांत पाटील यांना सन्मानित केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
या घटनेमुळे चंद्रकांत पाटील यांच्या आगामी निवडणूक तयारीवर याचा परिणाम होऊ शकतो. गजा मारणे याच्यासोबतच्या या सत्कारामुळे विरोधकांना एक नवीन मुद्दा मिळाला आहे, जो आगामी काळात त्यांच्या राजकीय कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
गजा मारणे हा पुण्यातील गुन्हेगारी विश्वात कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. त्याच्या नावावर अनेक गंभीर गुन्हे आहेत
आणि तो काही काळ येरवडा आणि तळोजा कारागृहात कैदेत होता.
त्याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत (MCOCA Act) देखील कारवाई झाली आहे.
तळोजा कारागृहातून (Taloja Jail) सुटल्यानंतर गजा मारणे याने पुण्यापर्यंत रोड शो आयोजित केला होता,
ज्यावरून अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सत्कार स्वीकारल्याने त्यांच्यावर प्रश्न विचारले जात आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा