Chhagan Bhujbal | अजित पवार गटाने महायुतीत मागितल्या ‘एवढ्या’ जागा; मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती

मुंबई: Chhagan Bhujbal | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election 2024) नेत्यांनी दौऱ्यास सुरुवात केली आहे. सभा, मेळावे मतदारसंघात पार पडत आहेत. मतदारसंघाचा आढावा आणि विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. यातच मागील काही दिवसांपासून कोणता पक्ष किती जागा लढवणार? महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला (Mahayuti Seat Sharing Formula) कसा असणार? यावर वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.
महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. लोकसभेला अजित पवार गटाची अवघी एक जागा निवडून आल्याने विधानसभेला अजित पवारांच्या अपेक्षित जागा महायुतीतुन मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Ajit Pawar NCP)
मात्र, आता अजित पवार यांनी महायुतीमध्ये किती जागा मागितल्या आहेत? याचा खुलासा अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. ” राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महायुतीमध्ये ८० ते ९० जागा मागितल्या आहेत”,असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळ म्हणाले, “आमचे जे कारभारी आहेत, मग त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे हे विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा करत असतात. त्यामुळे विधानसभेच्या जागावाटपासंदर्भातील चर्चा कुठपर्यंत आली हे त्यांना माहिती असतं.
मी त्या चर्चांमध्ये जास्त लक्ष घालत नाही. त्यांनीही मला जास्त काही सांगितलं नाही. पण मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महायुतीमध्ये ८० ते ९० जागा मागितल्या आहेत. त्यावर किती निकाल येतो? याची मला कल्पना नाही”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात
Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”
Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली