Chhagan Bhujbal On Sharad Pawar | ‘पाठीमागून सल्ले द्यायचे आणि आरक्षणावरून महाराष्ट्र पेटवण्याचं…’; भुजबळांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

chhagan bhujbal sharad pawar

बारामती : Chhagan Bhujbal On Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा (Ajit Pawar NCP) जनसन्मान मेळावा आज बारामतीत (Baramati Sabha) पार पडला. यावेळी छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणातून आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करताना शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यातले एक जेष्ठ नेते म्हणून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचं सोडून विरोधी पक्षांना काहीही सल्ले दिले जात आहेत. आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचे काम काही लोक करीत आहेत असा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर केला आहे. यावेळी अजित पवार, सुनील तटकरे (Sunil Tatkare) यावेळी उपस्थित होते. (Maratha Reservation – OBC Reservation)

“आरक्षणाचा इतका महत्त्वाचा प्रश्न राज्यात आहे. त्यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही तो प्रश्न सोडवला पाहिजे. तुमचं वैर या छगन भुजबळशी असेल किंवा अजित पवारांशी असेल ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलं आहे? हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? विरोधी पक्षाचे नेते बैठकीला येणार होते त्यांना बारामतीतून फोन गेला म्हणून ते आले नाहीत.” असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.

भुजबळ म्हणाले, “विरोधी पक्षातल्या नेत्यांना काहीतरी सल्ले द्यायचे. त्यानंतर पाठीमागून महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग करायचे. आम्ही सगळ्या विरोधी पक्षांना सांगतो आहे की, सामाजिक प्रश्न सोडवत असताना मुद्दाम बहिष्कार टाकायचा, मुद्दाम तिथे यायचं नाही हे योग्य नाही. निवडणूक असेल तेव्हा तुमचे झेंडे हाती घ्या, तुमचे मुद्दे मांडा. आम्ही आमचे मुद्दे मांडतो, आमचे झेंडे हाती घेतो. मात्र सामजिक प्रश्नी सगळ्यांनी एकत्र यायला हवं. ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडून चालणार नाही, हे अजिबात योग्य नाही. बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात सर्व समाजाचे लोक आहेत. सगळे आमचे आहेत आणि तुमचेही आहेत. एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सुबुद्धी देओ” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले, “आरक्षणाचा वाद मिटावा म्हणून सरकारने मिटिंग बोलवली होती. सर्वपक्षीय नेत्यांना बोलवण्यात आले होते.
विरोधी पक्षातले नेते येणं क्रमप्राप्त होतं. आम्ही विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड या सगळ्यांना सांगितलं होतं.
शरद पवारांनाही या बैठकीला बोलवा हे सांगितलं होतं. व्ही. पी. सिंग यांनी जे आरक्षण दिलं त्याची अंमलबजावणी शरद पवारांनी केली म्हणून आम्ही आजवर त्यांचे आभारही मानले. मात्र ज्यावेळी आरक्षणाच्या बाबतीत प्रश्न निर्माण होत असतात तेव्हा अपेक्षा हीच असते की शरद पवारांनी बैठकीला यायला हवं होतं.” असं भुजबळ यांनी म्हंटलं.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात बेकायदा पिस्तूल मित्राला दाखवताना गोळीबार, एक जखमी

Mumbai Police Constable Wife Suicide | हुंड्यासाठी पोलीस पतीचे टोमणे, हळद उतरण्यापूर्वीच पत्नीने आयुष्य संपवलं!

Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटींगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड