Chinchwad Assembly Constituency | चिंचवड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार; शत्रुघ्न काटेंचे शक्तिप्रदर्शन

Shatrughna Kate

चिंचवड : Chinchwad Assembly Constituency | लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदललेली आहेत. सर्वपक्षीयांकडून आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु झालेली आहे. दरम्यान चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप (Ashwini Jagtap), शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap), चंद्रकांत नखाते (Chandrakant Nakhate) पाठोपाठ आता स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे (Shatrughna Kate) यांनी चिंचवड विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे म्हंटले आहे.

दोन वेळा नगरसेवक राहिलेले शत्रुघ्न काटे यांनी चिंचवड विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. पिंपळे सौदागरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक घेतली. कार्यकर्त्यांनी शत्रुघ्न काटे यांना आमदारकी लढवण्यासाठी आग्रह केला. शत्रुघ्न काटे यांनीही भाजपमधील नेत्यांवर नाराजी व्यक्त करत चिंचवड विधानसभा लढवण्यावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. (Chinchwad Assembly Constituency)

भाजप श्रेष्ठीने दोन वेळेस महापौर पद, विरोधी पक्षनेते पद आणि स्थायी समितीचे चेअरम पद देऊ असं म्हटलं. मात्र, ऐनवेळी पक्षाने काटे यांना डावलले. पक्षावर नाराज असलेले शत्रुघ्न काटे यांनी आता मात्र माघार घेणार नसल्याचे सांगत चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे म्हंटले आहे.

लोकशाहीत सर्वांना मतं आणि उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे.
विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, चंद्रकांत नखाते पाठोपाठ
आता स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे इच्छुक असल्याने भाजपची डोकेदुखी वाढू शकते.
भाजपने मला संधी दिली नाही तर बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचं शत्रुघ्न काटे यांनी म्हंटले आहे.
दरम्यान ऐनवेळी शत्रुघ्न काटे बंडखोरी करू शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात बेकायदा पिस्तूल मित्राला दाखवताना गोळीबार, एक जखमी

Mumbai Police Constable Wife Suicide | हुंड्यासाठी पोलीस पतीचे टोमणे, हळद उतरण्यापूर्वीच पत्नीने आयुष्य संपवलं!

Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटींगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड