Chinchwad Assembly Constituency | ‘… तर यंदा चिंचवडमध्ये अपक्ष आमदार दिसेल’, अजित पवार गटातील नेत्यांचा बंडाचा इशारा, 20 पेक्षा जास्त नगरसेवक पर्यायी भूमिकेत

Ajit-Pawar

चिंचवड : Chinchwad Assembly Constituency | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलेली आहे. महायुतीत आणि महाविकास आघाडीत (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) तीन-तीन पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे जागावाटपावरून तिढा निर्माण होत असल्याचे चित्र आहे. इच्छुक उमेदवारांकडून जागेसाठी रस्सीखेच सुरु आहे.

https://www.instagram.com/p/DAX0OpPp66a

दरम्यान महायुतीत त्या-त्या विद्यमान आमदाराला ती जागा सोडली जाणार असल्याचा जागावाटपाचा फॉर्म्युला आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघात बंडखोरी होणार हे अटळ असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

https://www.instagram.com/p/DAXyHB-pGwI

पिंपरी-चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जातो. चिंचवड विधानसभेत सध्या भाजपच्या (BJP MLA) अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या विद्यमान आमदार आहे. या मतदारसंघातून त्यांचे दिर शंकर जगताप (Shankar Jagtap) हेही इच्छुक आहेत. चिंचवडची जागा महायुतीत जवळपास भाजपला सुटेल असे चित्र आहे. दरम्यान अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी ही जागा आपणाला मिळावी म्हणून दबावतंत्र आखले आहे.’

https://www.instagram.com/p/DAXwbm4CDuZ

भाजपासोबत अजित पवार यांनी युती केल्याने महायुतीची ताकद वाढली, पण अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याचे सांगत शहरातील माजी नगरसेवक प्रशांत शितोळे (Prashant Shitole), मयूर कलाटे (Mayur Kalate), मोरेश्वर भोंडवे (Moreshwar Bhondve), विनोद नढे (Vinod Nadhe) या चार नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन बंडाचा एल्गार केला आहे.

https://www.instagram.com/p/DAXur6cirPw

चिंचवड विधानसभेत भाजपचे काम करणार नाही असे म्हणत चारही नगरसेवकांनी आम्हाला न्याय मिळाला नाही तर २००९ सालाप्रमाणे पुन्हा एकदा चिंचवड विधानसभेला अपक्ष आमदार बघायला मिळेल, असे म्हंटले आहे.

https://www.instagram.com/p/DAXtLeKJ63n

“अजित पवारांनी मित्रपक्ष भाजपाकडे आग्रह धरून ही जागा आपल्याकडे घ्यावी.
अन्यथा आम्ही वीसपेक्षा जास्त नगरसेवक पर्यायी मार्ग निवडून निवडणुक लढवू. लवकरच संगनमताने निर्णय घेत,
नवा चेहरा चिंचवड विधानसभेत दिसेल व लवकरच तो जाहीर केला जाईल”,
असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे. (Chinchwad Assembly Constituency)

https://www.instagram.com/p/DAXrMhDJ28P

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Viman Nagar Pune Crime News | प्रवासादरम्यान माझ्याजवळ झोप असे म्हणत बसचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्‍यास पोलिसांनी केली अटक

Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’