Deepak Kesarkar On Badlapur School Girl Incident | बदलापूरच्या शाळेतील 15 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब; मंत्री दिपक केसरकरांची धक्कादायक माहिती

Deepak Kesarkar

मुंबई: Deepak Kesarkar On Badlapur School Girl Incident | बदलापूर प्रकरणात शाळेतील सीसीटिव्हीचे मागील १५ दिवसांचे रेकॉर्डिंग गायब झाले आहे. सीसीटीव्ही गायब झाल्याची बाब शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतून समोर आल्याची माहिती मंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे. तसेच शाळेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती असतानाही कारवाई केली नाही, असे देखील दिपक केसरकर म्हणाले. (Deepak Kesarkar On Badlapur School Girl Incident)

दिपक केसरकर म्हणाले, प्रत्येक शाळेत सीसीटिव्ही लावणे हे आवश्यक आहे. तसेच त्याचे १५ दिवसाचे रेकॉर्डिंगही गायब आहे. त्याची चौकशी करत आहोत. शाळांमध्ये मदतकक्ष सुरू करत आहे. शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतून ही बाब समोर आली आहे. १५ दिवसांचे सीसीटीव्ही आढळलेले नाही, असे अहवालात म्हटले आहे. मुलीच्या कुटुंबियांची भेट आम्ही लवकरच घेणार असून या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेत आहे. तिच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेत आहे.

सध्या आम्ही फक्त वस्तुस्थिती तपासतोय आणि पोलिसांना पुढील तपासासाठी देत आहोत. अत्याचाराच्या घटनेतील मुलीला १० लाखाची मदत केली जाईल आणि जिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झालेला आहे तिला ३ लाखांची मदत करणार आहे. दोघींच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही उचलू त्यासाठी लागणारी आर्थिक मदत दर महिन्याला चेक स्वरूपात देण्यात येणार आहे. मुलीची ओळख उघडकीस येणार नाही याची काळजी घेऊ, दोन्ही मुलींना आम्ही मदत करू, असेही केसरकर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, बदलापूर येथील शाळेत घडलेल्या प्रकारासंदर्भात समिती नेमण्यात आली होती.
या अहवालात समोर आलेल्या माहितीनुसार आम्ही आज यावर निर्णय घेतला आहे.
मुलींना शौचालयात घेऊन जाण्यासाठी कामिनी गायकर, निर्मला भुरे दोन सेविका होत्या.
लहान मुलांना शौचास नेण्यास त्यांची ड्युटी होती. या दोघी चौकशीला उपस्थित नव्हत्या. या दोघी हजर असत्या तर ही घटना घडली नसती. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून सहआरोपी करावे असे आम्ही सांगितले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | मुलीच्या औषधाला नाही, दारुला पैसे आहेत, म्हटल्याने पत्नीचे डोके भिंतीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न

Maharashtra Assembly Election 2024 | मुंबईतील 7 जागा लढवण्याची शरद पवार गटाची तयारी; इच्छुक उमेदवारांची नावेही आली समोर; जाणून घ्या

BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – “मित्रपक्षांनाही जो चेहरा नकोसा झालाय, त्याला …”

You may have missed