Demand Of Recounting Of Votes In Pune | पुण्यातील ‘या’ उमेदवारांकडून फेर मतमोजणीची मागणी, EVM पडताळणीसाठी पैसे भरून केला अर्ज

EVM

पुणे: Demand Of Recounting Of Votes In Pune | विधानसभेच्या निवडणुकीत दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. या पराभवाचे खापर त्यांनी ईव्हीएम वर फोडलं आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीन मॅनेज केल्याचा आरोप नेत्यांकडून केला जात आहे. याबाबत पूर्ण तपासणी व्हावी अशी अपेक्षा काही पराभूत नेत्यांची आहे. (Maharashtra Assembly Election Results 2024)

त्यामुळे फेर मतमोजणीसाठी जिल्ह्यातील ११ उमेदवारांनी एव्हीएम पडताळणीसाठी पैसे भरून अर्ज केला आहे. मतदान यंत्र पडताळणीसाठी प्रत्येकी शुल्क आणि त्यावर जीएसटी असे एकूण ४७ हजार रुपये प्रति यंत्र याप्रमाणे शुल्क जमा करण्यात आले आहे.

हडपसर मतदारसंघातील (Hadapsar Assembly) शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे (Sharad Pawar NCP) उमेदवार प्रशांत जगताप (Prashant Jagtap), शिरूर (Shirur Assembly) राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक पवार (Ashok Pawar), काँग्रेसचे पुणे कॅन्टोन्मेंटचे (Pune Cantonment) उमेदवार रमेश बागवे (Ramesh Bagwe), राष्ट्रवादीचे खडकवासलाचे (Khadakwasla Assembly) उमेदवार सचिन दोडके (Sachin Dodke) या वरिष्ठ नेत्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे.

प्रामुख्याने मतदान केंद्रावर पडलेली मते आणि प्रत्यक्षात पडलेल्या मतांमध्ये मोठी तफावत असल्याचा संशय या उमेदवारांना आहे. या शंकेचे निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्यांनी एकूण मतदान केंद्राच्या किंवा मतदान यंत्र संख्येच्या पाच टक्के या प्रमाणामध्ये मतदान यंत्रांची पडताळणी करून घेण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar News | सत्तास्थापनेच्या दिरंगाईवरून शरद पवारांची टीका; म्हणाले – ‘…
हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय’

PMC Property Tax | समाविष्ट गावांतील मिळकत कर थकबाकी वसुलीला स्थगिती ! मात्र,
जुन्या हद्दीतील थकबाकी वसुलीसाठी एक डिसेंबरपासून बँड पथक

Sinhagad Road Pune Crime News | पुणे: इस्टेट एजंटचा निर्घुण खुन करणाऱ्या चौघांच्या
हवेली पोलिसांनी मुसक्या आवळल्या (Video)

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी

Rohidas Gavde-Varsha Patole | सैन्यदलातून सेवानिवृत्तीनंतर शासनाच्या सेवेत आलेल्या रोहिदास गावडे
यांचे योगदान प्रेरणादायी – उपसंचालक वर्षा पाटोळे

You may have missed