Devendra Fadnavis On Narayan Rane | मालवणच्या राड्यावर गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले – “नारायण राणेंना धमकी…”

Devendra Fadnavis - Narayan Rane

नागपूर : Devendra Fadnavis On Narayan Rane | मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा (Malvan Shivaji Maharaj Statue) कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. यावरून राज्यात संतापाची लाट आहे. आज मालवण येथील राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) नेत्यांमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस म्हणाले ,” मालवणच्या घटनेवर कुणीच राजकारण करू नये, ही माझी विनंती आहे. महाराजांचा पुतळा कोसळणे ही दुःखद घटना आहे. अशा घटनांची योग्य चौकशी करून कोण दोषी आहेत, हे समोर आले पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याठिकाणी पुन्हा भव्य असा पुतळा उभारला गेला पाहिजे.

आम्ही या तीनही गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले आहे. नौदलाने ही बाब गांभीर्याने घेतली असून चौकशी समिती तयार केली आहे. या समितीने पुतळ्याच्या ठिकाणी पाहणी केली आहे. नौदल यावर उचित कारवाई करेल. जे दोषी असतील त्यांच्याविरोधात कारवाई करेल.”

नारायण राणे यांनी पत्रकार आणि पोलिसांना धमक्या दिल्या, असाही प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, नारायण राणे यांची बोलण्याची पद्धतच तशी आहे. ते आक्रमकपणे बोलतात पण त्यांना धमकी द्यायची असेल, असे मला वाटत नाही.

फडणवीस पुढे म्हणाले, महाराजांचा पुतळा कोसळण्यासाठी नेमकी कोणती घटना जबाबदार होती.
त्यात काय चुका राहिल्या, या संदर्भातला अहवाल नौदल देणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागानेही पोलिसांत एफआयआर दाखल केलेला आहे.
नौदलाच्या अहवालानंतर पुढील कारवाई पोलिसांकडून केली जाईल.
तसेच मुख्यमंत्र्यांनी जाहिर केल्याप्रमाणे नौदलाच्या मदतीने पुन्हा त्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारला जाईल.

ही घटना घडल्यानंतर जे जे करणे आवश्यक आहे, ते केले जात आहे.
तरीही विरोधकांकडून प्रत्येक गोष्टीकडे निवडणुकीच्या चष्म्यातून पाहिले जात आहे.
हे अत्यंत चुकीचे असून विरोधकांनी खालच्या पातळीचे राजकारण करू नये,
असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”

Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून

Malabar Gold & Diamonds | मलाबार गोल्ड अँड डायमंड्सला 2023-24 साठी प्रतिष्ठित ‘इंडिया गोल्ड कॉन्फरन्स’ पुरस्काराने केले सन्मानित

Chief Engineer Rajendra Pawar | मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार प्रदान

You may have missed