Devendra Fadnavis On Sharad Pawar | पुतळ्याच्या बाबतीत पवारांनी भ्रष्टाचाराबाबत केलेली टीका फडणवीसांच्या जिव्हारी; म्हणाले – “पवारांना निवडणुका पाहून असे वक्तव्य करणे शोभत नाही”

Devendra Fadnavis sharad pawar

नागपूर : Devendra Fadnavis On Sharad Pawar | मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा (Malvan Shivaji Maharaj Statue) सोमवारी (दि.२६) दुपारी एकच्या सुमारास कोसळला. नट बोल्ट गंजल्याने हा पुतळा कोसळला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. तर ही घटना घडली तेव्हा वाऱ्याचा वेग ४५ किमी प्रतितास होता. त्यामुळे पुतळा कोसळला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले. यावरून शरद पवार यांनी महायुती सरकारवर (Mahayuti Govt) निशाणा साधला.

शरद पवार म्हणाले, ” साधी सरळ गोष्ट आहे यात राजकारण कुठेय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रांझ्याच्या पाटलाने एका महिलेवर अत्याचार केले. त्यावेळी ही तक्रार छत्रपती शिवरायांपर्यंत गेली. त्यानंतर त्यांनी त्याचे दोन्ही हात कलम केले.

अशा कृत्याची परिणीती काय हे त्यांनी जनतेच्या समोर ठेवलं. एका भगिनीला त्रास दिला म्हणून एवढा कठोर निर्णय त्यांनी घेतला. आज असा निर्णय घेणाऱ्याची प्रतिकृती तयार करण्यात जो भ्रष्टाचार झाला त्यामुळे ती मूर्ती उद्धवस्त झाल्याची दिसते”, अशी टीका महायुती सरकारवर पवारांनी केली.

या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नेव्हीने तयार केला. राज्यसरकारने तयार केला नाही. हे पवार यांना माहीत आहे. भ्रष्टाचार कुठेच नको. त्याला शरद पवार काय तर सगळ्यांचाच विरोध असला पाहिजे. मात्र, पवार यांच्यासारख्या नेत्याला निवडणुका पाहून असे वक्तव्य करणे शोभत नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नागपुरात बुधवारी (दि.२८) पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, मालवणच्या घटनेवर कोणीच राजकारण करू नये.
निश्चितपणे ही घटना कमीपणा आणणारी व दुःखद आहे.
याची योग्य चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. नेव्हीने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन चौकशी टीम तयार केली आहे.

ते पाहून गेले आहेत. नेव्ही दोषींवर कारवाई करेल. बांधकाम विभागाने पोलिसात तक्रार केली आहे.
नेव्हीच्या रिपोर्ट नंतर पोलीस कारवाई करतील. जे सिव्हिलीयन त्या टीममध्ये होते त्यांच्यावर कारवाई होईल,
असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis On Sharad Pawar)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”

Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून

Malabar Gold & Diamonds | मलाबार गोल्ड अँड डायमंड्सला 2023-24 साठी प्रतिष्ठित ‘इंडिया गोल्ड कॉन्फरन्स’ पुरस्काराने केले सन्मानित

Chief Engineer Rajendra Pawar | मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार प्रदान